सकाळ डिजिटल टीम
उपवासाच्या दिवशी फराळाची चव वाढवण्यासाठी शेंगदाण्याची झणझणीत आमटी एक उत्तम पर्याय आहे.
मुठभर शेंगदाणे,३-४ हिरव्या मिरच्या,१ चमचा जिरं,पाणी,१ बटाटा,तेल,मीठ
मिक्सर मध्ये भाजलेले शेंगदाणे, हिरव्या मिरच्या, जिरं आणि पाणी घालून पेस्ट तयार करा.
कढईत २ चमचे तेल गरम करा. त्यात जिरं आणि बटाट्याचा किस घालून २ मिनिटे परतवून घ्या.आता त्यात शेंगदाण्याची पेस्ट आणि १ कप पाणी घालून मिक्स करा.
चवीनुसार मीठ आणि जर तुमचाकडे चालत असेल तर, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करा. आमटीला उकळी आल्यानंतर गॅस बंद करा.
ही शेंगदाण्याची आमटी डोसा किंवा उपवासाची इडली, साबूदाणा वडा, या सोबत चांगली लागते.
वरीच्या तांदळासोबत शेंगदाण्याची आमटी चविष्ट आणि पौष्टिक कॉम्बिनेशन आहे. ज्यामुळे दिवसभर जिभेवर चव राहते.