सकाळ डिजिटल टीम
शिवलिंग म्हणजे एक अद्भुत विज्ञान आणि अध्यात्माचा संगम आहे. अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्या मते, विज्ञान आणि अध्यात्म एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. शिवलिंग मानवाच्या आतल्या पावित्र्याची आणि शक्तीची प्रतीक आहे.
शिवलिंगातील अनंत सकारात्मक ऊर्जा मानवी अस्तित्व समृद्ध करते. याच कारणामुळे ‘एक लोटा जल सारी समस्यका हल’ हे म्हटले जाते.बहुतेक शिवमंदीर नदीकाठी असतात.
बेलाच्या पानांमध्ये मधुमेहविरोधी गुणधर्म आहेत आणि त्याचा वापर शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी होतो. तसेच बेल फळाचे इतर औषधी उपयोगही आहेत.
शिवलिंग म्हणजे ब्रम्हांडाची प्रतीक आहे. स्कंदपुराणानुसार ब्रम्हांडाची ऊर्जा वृत्ताकार रूपात दहा दिशांमध्ये पसरते आणि त्या आकाराचे प्रतीक म्हणजे ‘शिवलिंग’.
शिवलिंग हे प्रचंड प्रमाणात किरणोत्सर्गी ऊर्जा शोषून घेते. जल अभिषेक केल्याने या किरणोत्सर्गाची शांतता होण्यास मदत होते, ज्यामुळे पृथ्वीवरील जीवनासाठी ते अत्यावश्यक आहे.
पाणी शिवलिंगाच्या संपर्काने ऊर्जा क्षमता वाढवते, ज्यामुळे मानव शरीर ते सहन करू शकत नाही. हे वैज्ञानिक कारण आहे ज्यामुळे पाण्याचा शिवलिंगाशी संपर्क निषिद्ध केला जातो.
शिवलिंगाचा अस्तित्व केवळ भारतातच नाही तर इजिप्त, इजरायल, फिलिस्तीन आणि दक्षिण आफ्रिका येथे देखील सापडले आहे. हे ब्रम्हांडस्तंभ, प्रकाशस्तंभ, आणि अग्निस्तंभ म्हणून ओळखले जाते.
सिंधु संस्कृतीत शिवलिंगाचे अस्तित्व इ.स. पूर्व ३००० पर्यंत आढळते. रावणाने शिवलिंगाची पूजा केली असल्याचे पुरावे रामायणात मिळतात.
कर्कवृत्तावर असलेले महाकालेश्वर ज्योर्तिलिंग आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे मानले जाते.
शिवलिंग वेगवेगळ्या प्रकारांनी बनवले जाते, जसे की माती, गोमय, लाकूड आणि रत्न. या सर्व शिवलिंगांचा मुख्य समानता म्हणजे ते सर्व ‘वृत्ताकार शिवलिंग’ आहेत, ज्यामध्ये पंचतत्त्वाचे रूप असते.
शिवलिंग हे एक अमूर्त चित्तवृत्त असलेले रूप आहे, आणि ते शिव व शक्तीच्या एकत्रित तत्त्वाचे प्रतीक आहे.
अगोदर शिवलिंगाच्या तंत्रशास्त्राने भूकंप मापन केंद्र म्हणून काम केले होते. मंत्रघोषणामुळे मंदिरांच्या भिंतीवर ऊर्जा द्विगुणित होत होती, ज्यामुळे त्याचे दर्शन आणि पूजन अत्यधिक महत्त्वाचे होते.