सकाळ डिजिटल टीम
महिला या अनेक वेळा घरी पनीर बनवण्याचा प्रयत्न करतात.
बहूतेक वेळा आपल्याला हवे तसे पनीर घरी होत नाही.
तुम्हाला ही दूकानात मिळते तसे पनीर घरी बनवायचे आहे का ?
मग घरी पनीर बनवतांना कोनती काळजी घ्यावी जाणून घ्या.
पनीर बनवण्यासाठी फुल-क्रीम दूध किंवा देशी गाई - म्हशीचे ताजे दूध वापरावे. कमी चरबीयुक्त दुधापासून बनवलेले पनीर कोरडे आणि कडक होऊ शकते.
दूध मध्यम ते मंद आचेवर हळूहळू उकळवा जेणेकरून पनीर मऊ होईल.
दूध फाटण्यासाठी तुम्ही लिंबाचा रस, पांढरे व्हिनेगर तसेच दह्याचा वापर करु शकतात.
दह्याचा वापर करून फाटलेल्या दुधाचे पनीर मऊमुलायम बनते.
पनीर तयार झाल्यानंतर जर तुम्ही लगेच वापरणार नसाल तर ते पाण्यात भिजवून फ्रिजमध्ये ठेवा.