Varsha Balhe
हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात मलाणा नावाचं एक गाव आहे. या गावाची संस्कृती, परंपरा आणि नियम इतर गावांपेक्षा खूप वेगळे आहेत. विशेष म्हणजे, इथं येणाऱ्या पर्यटकांनाही स्थानिक नियमांचं पालन करावं लागतं.
Malana Village No Touch Rule
esakal
मलाणा गावातील सर्वात वेगळा नियम म्हणजे 'नो टच' नियम. पर्यटकांना गावातील घरांच्या भिंती, मंदिरं किंवा स्थानिकांच्या वस्तूंना स्पर्श करण्याची परवानगी नाही. त्यामुळे गावात फिरताना विशेष काळजी घ्यावी लागते.
Malana Village No Touch Rule
esakal
या गावात दुकानातून वस्तू खरेदी करतानाही वेगळी पद्धत आहे. दुकानदार वस्तू थेट हातात देत नाहीत. ग्राहकांना पैसे काउंटरवर किंवा ठरलेल्या जागी ठेवावे लागतात आणि दुकानदार तिथेच वस्तू ठेवतो.
Malana Village No Touch Rule
esakal
मलाणा गावातील स्पर्श न करण्याचा नियम मोडल्यास पर्यटकांकडून दंड आकारला जाऊ शकतो. काही ठिकाणी यासाठी २,५०० ते ३,५०० रुपयांपर्यंत दंड आकारला जात असल्याचे सांगितले जाते. हा पैसा स्थानिक शुद्धीकरणाच्या विधीसाठी वापरला जातो.
Malana Village No Touch Rule
esakal
मलाणा गावातील काही मंदिरं आणि पवित्र ठिकाणी बाहेरील लोकांना प्रवेश दिला जात नाही. तसंच, काही विशिष्ट भागांमध्ये फोटो काढण्यासही मनाई आहे. त्यामुळे फोटो काढण्यापूर्वी स्थानिकांची परवानगी घेणं आवश्यक आहे.
Malana Village No Touch Rule
esakal
मलाणा गावाची स्वतःची पारंपरिक न्यायव्यवस्था आहे. गावातील महत्त्वाचे निर्णय स्थानिक सभांमधून घेतले जातात. जमलू ऋषी हे गावाचे आराध्य दैवत असून त्यांच्या परंपरांना गावात विशेष महत्त्व दिलं जातं.
Malana Village No Touch Rule
esakal
मलाणा गावातील लोक 'कनाशी' नावाची वेगळी भाषा बोलतात. ही भाषा प्रामुख्याने याच गावातील लोकांमध्ये वापरली जाते. स्थानिक लोक स्वतःला सिकंदरच्या सैनिकांचे वंशज मानतात. मात्र, या दाव्याला ठोस ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही. त्यामुळे मलाणा गावाची संस्कृती आणि परंपरा आजही पर्यटकांसाठी कुतूहलाचा विषय ठरतात.
Malana Village No Touch Rule
esakal
Ancient Human Life in Maharashtra
esakal