जगातील एकमेव नर जो पिल्लांना जन्म देतो, 'या' प्राण्याबद्दल तुम्हाला माहितेय का?

Mansi Khambe

जैविक नियम

सामान्यतः सस्तन प्राणी आणि जीवांमध्ये मादी पिल्लांना जन्म देते, पण काही विशिष्ट प्रजातींनी हा जैविक नियम बदलून दाखवला आहे. जगात असा एक नर आहे जो त्याच्या बाळांना जन्म देतो.

Seahorse Reproduction

|

ESakal

समुद्री घोडा

समुद्री घोडा (Seahorse) हा असा नर प्राणी आहे जो पिल्लांना जन्म देतो.

Seahorse Reproduction

|

ESakal

गर्भधारणा

समुद्री घोडा मादी सर्व अंडी नराच्या पोटावरील एका विशेष थैलीत टाकते. नराची ही थैली मानवी प्लेसेंटाप्रमाणे कार्य करते आणि वाढत्या पिल्लांना ऑक्सिजन व पोषण पुरवते.

Seahorse Reproduction

|

ESakal

प्रसूती

सुमारे २ ते ४ आठवड्यांच्या गर्भधारणेनंतर, नराच्या पोटात आकुंचन होऊन तो शेकडो ते हजारो पिल्लांना जन्म देतो.

Seahorse Reproduction

|

ESakal

प्रसूती वेदना

गर्भधारणेनंतर पिल्ले पूर्ण विकसित झाल्यानंतर नर सीहॉर्सला प्रसूती वेदना सुरू होतात. यावेळी नर सीहॉर्स त्याचं शरीर वारंवार वाकवतो आणि शेकडो ते हजारो पिल्लांना जन्म देतो.

Seahorse Reproduction

|

ESakal

2000 पिल्लांना जन्म

सीहॉर्स एका वेळी 100 ते 2000 पर्यंत पिल्लांना जन्म देतात. जन्मानंतर ही पिल्ले अगदी लहान सीहॉर्ससारखी दिसतात आणि लगेच स्वतंत्र जीवन सुरू करतात. त्यानंतर आई-वडील त्यांची कोणतीही काळजी घेत नाहीत.

Seahorse Reproduction

|

ESakal

प्रजनन

शास्त्रज्ञांच्या मते, ही व्यवस्था प्रजातीच्या अस्तित्वासाठी फायदेशीर आहे. या प्रजातीमधील मादी अंडी दिल्यानंतर लगेच नवीन अंडी तयार करण्यास सुरुवात करते. त्यामुळे आधीच्या अंड्यांची काळजी नर घेतो.

Seahorse Reproduction

|

ESakal

पिल्ले

या प्रक्रियेमुळे या प्रजातीच्या प्रजननाचा वेग वाढतो. सीहॉर्सची ही पिशवी केवळ संरक्षणच नाही तर तिच्यातील पाणी देखील नियंत्रित करते. ज्यामुळे समुद्रातील वातावरणासाठी पिल्ले तयार होतात.

Seahorse Reproduction

|

ESakal

हार्मोनल बदल

तथापि, काही संशोधनांमध्ये गर्भावस्थेदरम्यान नर सुमुद्री घोड्याच्या शरीरात हार्मोनल बदल होतात, जे मादी हार्मोन्सप्रमाणे कार्य करतात, असे देखील आढळून आले आहे.

Seahorse Reproduction

|

ESakal

इतर प्राणी

इतकेच नव्हे तर सीहॉर्स व्यतिरिक्त पाइपफिश (Pipefish) आणि सी ड्रॅगन (Sea Dragon) या सिग्नॅथिडे (Syngnathidae) कुळातील नर प्राणी देखील पिल्लांना जन्म देतात.

Seahorse Reproduction

|

ESakal

भूकंप असो वा त्सुनामी, 'या' प्राण्यांना नैसर्गिक आपत्ती येण्याचे संकेत मिळतात

Animals Gets signals of natural disasters

|

ESakal

येथे क्लिक करा