पुरुषांची फर्टिलिटी धोक्यात आणतात 3 सवयी; अनेक जण रोज करतायत 'ही' चूक

Shubham Banubakode

बाबा होण्यात अडचणी

आई-बाबा होण्यात अडचणी येण्याचं प्रमाण वाढत आहे. यामागे महिलांइतकाच पुरुषांचाही मोठा वाटा असू शकतो. त्यामुळे पुरुषांनीही आपल्या आरोग्याकडे गांभीर्याने पाहायला हवं.

Male Infertility

|

esakal

शुक्राणूंची संख्या

शुक्राणूंची संख्या कमी असणे, त्यांची गुणवत्ता कमी असणे किंवा ते योग्य प्रकारे कार्य न करणं यामुळे नैसर्गिकरित्या बाबा होण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात.

Male Infertility

|

esakal

शुक्राणूंची गुणवत्ता

वारंवार हॉट टब किंवा सॉनामध्ये बसल्यामुळे अंडकोषाचं तापमान वाढतं. त्यामुळे शुक्राणूंची निर्मिती आणि गुणवत्ता काही महिन्यांसाठी कमी होऊ शकते.

Male Infertility

|

esakal

शुक्राणूंवर परिणाम

घट्ट अंडरवेअरमुळे अंडकोषाभोवती उष्णता वाढते. दीर्घकाळ अशी सवय राहिली तर शुक्राणूंच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो.

Male Infertility

|

esakal

धूम्रपान घातक

धूम्रपान असो किंवा ई-सिगारेट, दोन्हीमधील हानिकारक रसायनं शुक्राणूंची गुणवत्ता आणि हालचाल कमी करू शकतात.

Male Infertility

|

esakal

लाईफस्टाईलमध्ये बदल

आपल्याला अगदी सामान्य वाटणाऱ्या काही सवयी भविष्यात कुटुंब वाढवण्याच्या स्वप्नावर परिणाम करू शकतात. त्यामुळे वेळेत लाईफस्टाईलमध्ये बदल करणं महत्त्वाचं आहे.

Male Infertility

|

esakal

प्रजनन क्षमता

संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, तणाव कमी ठेवणं आणि व्यसनांपासून दूर राहणं यामुळे प्रजनन क्षमता टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकते.

Male Infertility

|

esakal

डॉक्टरांचा सल्ला आवश्यक

बराच काळ प्रयत्न करूनही मूल होत नसेल तर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. योग्य वेळी तपासणी आणि उपचार केल्यास अनेक समस्या सोडवता येऊ शकतात.

Male Infertility

|

esakal

स्पेसमध्ये शरीरसंबंध का टाळले जातात? NASA ने सांगितलं यामागचं मोठं कारण

Why physical relation Is Not Allowed in Space

|

esakal

हेही वाचा -