बेबी प्लॅन करताय? पुरुषांसाठी संभोग करण्याचा सर्वोत्तम काळ कोणता?

Anushka Tapshalkar

बेबी प्लॅनिंग

प्रेग्नन्सी प्लॅन करणं हे एक टिमवर्क आहे. त्यामुळे फक्त स्त्रीच नाही, तर पुरुषाचाही वेळ आणि शरीराची लय तितकीच महत्त्वाची असते.

Baby Planning

|

sakal

फक्त ओव्हुलेशनवर लक्ष देणं अपुरं

बहुतेक जोडपी फक्त स्त्रीच्या ओव्हुलेशनवर लक्ष केंद्रित करतात, पण पुरुषांचं “टाइमिंग”ही तितकंच महत्त्वाचं असतं, ज्याबद्दल बरेच लोक बोलत नाहीत.

Don't Depend Only Ovulation 

|

sakal

शुक्राणूंची गुणवत्ता रोज बदलते

दिवस, झोप, तणाव आणि अंतर यावर शुक्राणूंची संख्या आणि हालचाल अवलंबून असते.

Sperm Quality Changes  Everyday

|

sakal

पुरुषांसाठी वेळ का महत्त्वाची आहे?

  • शुक्राणूंची गुणवत्ता दररोज बदलते.

  • झोपेमुळे हार्मोन्सची पातळी कमी-जास्त होते.

  • तणाव आणि थकवा यामुळे शुक्राणूंची हालचाल कमी होते.

  • वीर्यपतनमध्ये जास्त अंतर ठेवल्यास गुणवत्ता कमी होते.

  • वारंवार वीर्यपतन केल्याने शुक्राणूंची संख्या कमी होऊ शकते.

Why Timing is Important for Men

|

sakal

लैंगिक संबंधांसाठी सर्वोत्तम वेळ

तज्ज्ञांच्या मते, सकाळी ६ ते ९ या वेळेत टेस्टोस्टेरॉनची पातळी जास्त असते, ऊर्जा उत्तम असते आणि तणावही कमी असतो. त्यामुळे लैंगिक संबंधांसाठी सकाळची वेळ सर्वोत्तम आहे.

Best Time for Intercourse

|

sakal

संध्याकाळही योग्य

संध्याकाळी ५ ते ८ ही दुसरा योग्य वेळ आहे, या काळात कारण शरीर आरामशीर (relaxed) असतं आणि नैसर्गिक हार्मोनल लय कामगिरीला मदत करते. पण रात्री १० नंतर थकवा वाढतो, टेस्टोस्टेरॉन कमी होतं आणि शुक्राणूंचं कार्य खराब होतं तसंच कामगिरीची चिंता जास्त असते.

Other Best Time for Intercourse

|

sakal

शुक्राणूंच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम वारंवारता

ओव्हुलेशनच्या दिवसांत प्रत्येक ४८ तासांनी संबंध ठेवणं योग्य असतं; पण ५–७ दिवसांचं मोठं अंतर किंवा दररोज सलग संबंध ठेवणं टाळा.

What is the Frequency of Intercourse for Correct Sperm Count

|

sakal

पुरुषांनी काय काळजी घ्यावी

  • किमान ७ तास झोप घ्या.

  • वृषणांवर उष्णता टाळा (मांडीवर लॅपटॉप ठेवू नका).

  • ओव्हुलेशनच्या दिवसांमध्ये लांब बाईक राईड करणं टाळा.

  • मद्यपान कमी करा.

  • झिंक, ओमेगा-३ आणि अँटीऑक्सिडंट्सचा आहारात समावेश करा.

Tips for Men for Fertility

|

sakal

निष्कर्ष

पुरुषांनी योग्य वेळ, लय आणि जीवनशैलीचं पालन केलं तर शुक्राणूंची गुणवत्ता सुधारते आणि प्रेग्नन्सीची शक्यता वाढते.

Conclusion 

|

sakal

PCOS असो किंवा नसो, Fertility वाढवण्यासाठी ‘हे’ 7 पदार्थ नक्की खा

Foods to Boost Fertility

|

sakal

आणखी वाचा