Aarti Badade
पुण्याजवळील मल्हारगड हा मराठा साम्राज्याच्या काळात बांधलेला ऐतिहासिक किल्ला आहे. २०२६ मध्ये या किल्ल्याला अंदाजे २६६ वर्षे पूर्ण झाली आहेत.
Malhargad Fort
esakal
सासवडजवळ असलेल्या या किल्ल्याला सोनोरी किल्ला असेही म्हणतात. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या सोनोरी गावामुळे त्याला हे नाव मिळाले.
Malhargad Fort
esakal
मल्हारगडाची उभारणी इ.स. १७५७ ते १७६० या काळात झाली. कृष्णराव माधवराव पानसे आणि भिवराव यशवंत पानसे यांचा या किल्ल्याच्या बांधकामाशी संबंध असल्याचे सांगितले जाते.
Malhargad Fort
esakal
पुणे-सासवड मार्गावरील दिवे घाटावर लक्ष ठेवण्यासाठी मल्हारगडाची उभारणी करण्यात आली होती. त्यामुळे या किल्ल्याला ऐतिहासिक आणि सामरिक महत्त्व प्राप्त झाले.
Malhargad Fort
esakal
मराठा साम्राज्याच्या काळात बांधण्यात आलेला मल्हारगड हा महाराष्ट्रातील शेवटचा बांधलेला गिरीदुर्ग म्हणून ओळखला जातो.
Malhargad Fort
esakal
मल्हारगडावर भगवान महादेव आणि खंडोबा यांची मंदिरे आहेत. खंडोबाला मल्हारी असेही म्हटले जाते. याच नावावरून किल्ल्याला मल्हारगड हे नाव पडल्याचे सांगितले जाते.
Malhargad Fort
esakal
मल्हारगड पुण्यापासून साधारण ३० ते ३५ किलोमीटर अंतरावर, सासवडजवळ भुलेश्वर डोंगररांगेत आहे. जवळच असलेल्या सोनोरी गावात पानसे सरदारांचा ऐतिहासिक वाडाही पाहायला मिळतो.
Malhargad Fort
Sakal
Sindhudurg Fort History
Sakal