संतोष कानडे
छत्रपती संभाजीनगर शहराची स्थापना १६१० मध्ये 'मलिक अंबर' याने केली होती, तो खरंच मूळचा एक गुलाम होता.
पूर्व आफ्रिकेतील (इथोपिया) एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या मलिक अंबरला लहानपणीच अरबांनी गुलाम म्हणून विकले होते.
वेगवेगळ्या मालकांकडून विकला जात शेवटी तो भारतात निजामशाहीच्या सेवेत दाखल झाला होता.
आपल्याकडील अफाट बुद्धिमत्ता, युद्धकौशल्य आणि व्यवस्थापन गुणांमुळे तो थेट अहमदनगरच्या निजामशाहीचा वजीर बनला.
मलिक अंबरने १६१० मध्ये आजच्या छत्रपती संभाजी नगर या शहराची स्थापना करून याचे मूळ नाव 'खडकी' असे ठेवले आणि आपली राजधानी येथे हलवली.
मलिक अंबरच्या सैन्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले हे एक प्रमुख आणि पराक्रमी सरदार होते.
शहराला पाणी पुरवण्यासाठी मलिक अंबरने जमिनीखालून वाहणारी 'नहर-ए-अंबरी' ही जगातील प्रगत पाणी प्रणाली विकसित केली.
पुढे औरंगजेबाने याच खडकीचे नाव 'औरंगाबाद' केले; ज्याचे नामकरण आता 'छत्रपती संभाजीनगर' करून संभाजी महाराजांच्या शौर्याचा सन्मान करण्यात आला आहे.