Shubham Banubakode
प्रेयसीला खूश करण्यासाठी एका तरुणाने चक्क सिंहाच्या पिंजऱ्यात प्रवेश केला आहे.
सिंहाच्या पिंजऱ्यात प्रवेश करणं त्याला चांगलंच महागात पडलं.
यावेळी सिंहाने केलेल्या हल्ल्यात त्या तरुणाचा मृत्यू झाला.
उझबेकिस्तानमधील एका खासगी प्राणी संग्रहालयात ही घटना घडली.
एफ इरिस्कुलोव असं या तरुणाचं नाव आहे.
प्रेयसीला खूश करण्यासाठी त्याने सिंहाच्या पिंजऱ्यात प्रवेश केला.
ही संपूर्ण घटना कॅमेरात कैद झाली आहे.
सुरुवातीला तरुणाने पिंजऱ्यात प्रवेश केला. त्यावेळी एक सिंह झोपला होता
त्याने त्याच्याजवळ जाऊन त्याला गोंजारण्यास सुरुवात केली. काही क्षणातच सिंबा नावाचा सिंह त्याच्या दिशेने आला.
त्यावेळी त्याने त्याला शांत केलं. मात्र, काही मिनिटांत दुसरा सिंहाने त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यातच त्याचा मृत्यू झाला.