Shubham Banubakode
ऑटो-ब्रुअरी सिंड्रोम (ABS) हा एक दुर्मिळ आजार आहे, ज्यामुळे मानवी पोटात आपोआप बीअर तयार होते.
काही वर्षांपूर्वी अमेरिकेतील एका ४६ वर्षीय व्यक्तीला हा आजार असल्याचे निदान झाले होतं.
२०१४ मध्ये या व्यक्तीला दारू पिऊन गाडी चालवल्याचा दंड ठोठावण्यात आला होता. पण, मुळात त्याने दारू प्यायलीच नव्हती.
पुढे २०१७ मध्ये त्याला ऑटो-ब्रुअरी सिंड्रोम या आजाराचे निदान झाले. त्यानंतर आपल्याला दंड का ठोठावण्यात आल त्याच्या लक्षात आलं.
या आजारामागे Saccharomyces Cerevisiae नावाचा फंगस आहे. हा फंगस कार्बोहायड्रेट्सचे अल्कोहोलमध्ये रूपांतर करतो, ज्यामुळे पोटात बीअर तयार होते.
ऑटो-ब्रुअरी सिंड्रोम इतका दुर्मिळ आहे की, गेल्या ३० वर्षांत जगभरात फक्त ५ जणांना हा आजार झाला.
२०११ मध्ये या व्यक्तीने एका जखमेसाठी अॅंटी-बायोटिक्स घेतल्या होत्या. यामुळे त्याच्या शरीरात हा फंगस वाढला आणि ऑटो-ब्रुअरी सिंड्रोमला सुरुवात झाली.
न्यूयॉर्कच्या रिचमंड युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरमधील तज्ज्ञ डॉक्टरांनी या दुर्मिळ आजाराचा अभ्यास करून त्याचे निदान केले.