सकाळ डिजिटल टीम
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली संविधान समितीने २ वर्षे ११ महिने आणि १७ दिवसात संविधान तयार केलं होतं. ते २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारण्यात आलं तर २६ जानेवारी १९५० रोजी ते लागू झालं.
Constitution Of India
Esakal
संविधानात सर्वात आधी राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची सही होणार होती. पण आधी पंडित नेहरू पोहचल्यानं त्यांनी सही केलेली. शेवटी राजेंद्र प्रसाद यांनी वरच्या बाजूला थोडी तिरकी सही केली.
Constitution Of India
Esakal
भारताचं संविधान एकमेव असं संविधान आहे ज्यात प्रत्येक भागात चित्रकलाही आहे. यात राम-सीता ते अकबर आणि टिपू सुलतान यांचीही चित्रे आहेत.
Constitution Of India
Esakal
संविधानाच्या मूळ कॉपीचं वजन १३ किलो इतकं आहे. याचा कागद इंग्लंडच्या बर्मिंघम शहरातून मागवण्यात आला होता.
Constitution Of India
esakal
संविधानाच्या मूळ प्रती सध्या नायट्रोजनच्या सीलबंद बॉक्समध्ये ठेवल्या आहेत. यात ऑक्सिजनचं प्रमाण १ टक्क्यापेक्षा जास्त नसतं.
Constitution Of India
Esakal
भारतीय संविधानाची मूळ कॉपी सुलेखनकार प्रेम बिहारी यांनी लिहिली होती. यासाठी त्यांनी काहीच मानधन घेतलं नाही पण एक अट घातली होती.
Constitution Of India
Esakal
नेहरूंच्या विनंतीवरून प्रेम बिहारी यांनी मूळ प्रत लिहिली. त्याचे मानधन म्हणून पैसे नको पण माझं नाव प्रत्येक पानावर लिहिणार तर शेवटच्या पानावर माझं आणि आजोबांचं नाव लिहीन असं म्हटलं होतं.
Constitution Of India
Esakal
संविधान लिहिण्यासाठी ६ महिन्यांचा कालावधी लागला. त्यासाठी ४३२ निब खराब झाल्या होत्या.
Constitution Of India
Esakal
भारतीय संविधान तयार करण्यासाठी जवळपास ६४ लाख रुपये इतका खर्च त्यावेळी आला होता. जगातील ६० देशांच्या संविधानाचा अभ्यास करून भारताचं संविधान तयार केलं गेलं.
Constitution Of India
Esakal
National Anthem Rules
sakal