रक्तातील वाढलेली साखर अन् हाय बीपीवर रामबाण उपाय ठरतील 'या' डाळी

Aarti Badade

वाढत्या आजारांवर डाएटचा उतारा

आजकाल चुकीची जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयींमुळे तरुणांमध्येही बीपी आणि डायबिटीजचे प्रमाण वाढले आहे.

Benefits of dal for Diabetes and bp

|

Sakal

डाळी आणि बीन्सचा चमत्कार

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, काही विशिष्ट डाळी आणि बीन्स रक्तातील साखर नैसर्गिकरित्या कमी करण्यास आणि रक्तवाहिन्यांवरील ताण कमी करण्यास मदत करतात.

Benefits of dal for Diabetes and bp

|

Sakal

मुग डाळ - मधुमेहींसाठी वरदान

मुग डाळ पचायला हलकी असते. तज्ज्ञांच्या मते, नियमित मुग डाळीचे सेवन केल्याने रक्तातील साखर (Blood Sugar) आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मोठी मदत होते.

Benefits of dal for Diabetes and bp

|

Sakal

मसूर डाळ - हृदयासाठी उत्तम

मसूर डाळीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि पोटॅशियम असते. हे घटक रक्तवाहिन्यांवरील दाब कमी करतात, ज्यामुळे हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांना आराम मिळतो.

Benefits of dal for Diabetes and bp

|

Sakal

चणा डाळ - ग्लुकोजवर नियंत्रण

चणा डाळीतील फायबर आणि पोटॅशियम शरीरातील ब्लड ग्लुकोजची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करते. हे ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यासाठी देखील प्रभावी मानले जाते.

Benefits of dal for Diabetes and bp

|

Sakal

फायबरचे महत्त्व

या डाळींमध्ये असलेल्या फायबरमुळे कर्बोदकांचे पचन संथ गतीने होते, ज्यामुळे रक्तातील साखर अचानक वाढत नाही. म्हणूनच डायबिटीज रुग्णांनी या डाळी आवर्जून खाव्यात.

Benefits of dal for Diabetes and bp

|

Sakal

तज्ज्ञांचा सल्ला

वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. तुमच्या आहारात कोणताही मोठा बदल करण्यापूर्वी किंवा औषधे सुरू करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

Benefits of dal for Diabetes and bp

|

Sakal

आवळा रस की लिंबूपाणी? कोणता ज्यूस व्हिटॅमिन्सचा खरा ‘बादशाह’?

Amla juice vs Lemon water Vitamin C

|

Sakal

येथे क्लिक करा