सकाळ डिजिटल टीम
मुलांच्या संगोपनापासून त्यांच्या भविष्यासाठी चिंता करणं, पालकांसाठी हा प्रवास आनंददायी असला तरी अनेकदा तणावाचा ठरतो.
पालकत्त्वाविषयी बऱ्याच गोष्टी सहज बोलल्या जातात, पण त्यातील ताण आणि जबाबदाऱ्या सर्वांनाच ठाऊक असतात का?
रील्समधले आदर्श चित्र वेगळं असतं. पण प्रत्यक्ष पालकत्त्व जबाबदारीचं आणि थकवणारं असतं.
शिक्षण, आर्थिक जबाबदाऱ्या, मुलांच्या अपेक्षा आणि समाजमान्यता—या सगळ्यांमुळे पालकांचा मानसिक ताण वाढतो आहे.
तणावाचा परिणाम केवळ पालकांवरच नाही, तर मुलांच्या मानसिक व शारीरिक आरोग्यावरही होतो.
नुकत्याच घडलेल्या काही घटनांमध्ये पालकांनी तणावाच्या अवस्थेत टोकाची पावलं उचलल्याचं पाहायला मिळालं.
संवाद, नियोजन, मदत घेणं, आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं—या गोष्टी पालकांना तणावमुक्त करतात.
पालकत्त्वाचा तणाव टाळण्यासाठी उपाय जाणून घ्या पुढील लेखात!