माणदेशाच्या दुष्काळी माळरानावर १.५ लाख झाडे कशी फुलवली? या बहीण भावाचा पराक्रम वाचून थक्क व्हाल!

Vinayan

१.५ लाख झाडे आणि १३ गावे!

जिथे दुष्काळ पाचवीला पुजलाय, तिथे दोन भावंडांनी आपल्या जिद्दीने उजाड माळरान अक्षरशः हिरवेगार करून दाखवले आहे!

Mandesh green revolution Rohit Rakshita

|

Sakal

पाण्याविना प्राण सोडलेले बाबा

एकेकाळी पाण्यासाठी एका धनगर बाबांनी इथे प्राण सोडले होते. त्यांची ती उन्हात तापलेली समाधी बघून या भावंडांचे आयुष्य बदलले.

Mandesh green revolution Rohit Rakshita

|

Sakal

लहान चिमणीची गोष्ट ठरली प्रेरणा

जंगलाची आग विझवणाऱ्या लहान चिमणीची गोष्ट ऐकून रक्षिताने ठरवले, "मीही तीच चिमणी होणार!" भावासोबत ती माळरानावर उतरली.

Mandesh green revolution Rohit Rakshita

|

Sakal

७० समतोल चर आणि १ कोटी लिटर पाणी

पावसामध्ये ७० समतोल चर खोदून त्यांनी पहिल्याच पावसात तब्बल १ कोटी लिटर पाणी जमिनीत मुरवले आणि आटलेला डोह पुन्हा जिवंत केला.

Mandesh green revolution Rohit Rakshita

|

Sakal

गावकऱ्यांचा विरोध, तरीही काम सुरू

सुरुवातीला लोक हसायचे, गुराखी ओरडायचे; पण त्यांनी कोणालाही उत्तर न देता फक्त आपले कष्टाचे काम सुरू ठेवले.

Mandesh green revolution Rohit Rakshita

|

Sakal

पक्षी, कोल्हे आणि समृद्ध वनराई

आज त्याच माळरानावर लावलेल्या झाडांना फळे येतात, पक्षी येतात आणि कोल्हे-लांडगेही परतले आहेत. एकेकाळी हसणारेच आता कौतुक करतात.

Mandesh green revolution Rohit Rakshita

|

Sakal

स्वतःची जमीन नाही, तरी उभी केली ३० जंगले

स्वतःच्या नावावर एक गुंठा जमीन नसताना गोंदवले खुर्दच्या रोहित आणि रक्षिताने छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कारासह २६६ पुरस्कार पटकावले आहेत!

Mandesh green revolution Rohit Rakshita

|

Sakal

दुष्काळ पुसणारी दोन पावले

माणदेशाच्या कपाळावरचा दुष्काळाचा कलंक पुसणारी ही भावंडे आज संपूर्ण देशासाठी प्रेरणा ठरली आहेत. तुम्ही शेवटचे झाड कधी लावले होते?

Mandesh green revolution Rohit Rakshita

|

Sakal

राजस्थानचे रहस्यमयी 'बड़ोदिया' गाव! जिथे पाहायला मिळतात विज्ञानाला थक्क करणारे अद्भूत चमत्कार

Barodiya Village in Rajasthan Shocks Science

|

Sakal

इथे क्लिक करा!