सकाळ डिजिटल टीम
प्रत्येक मंदिरावर कळस का असतो तुम्हाला माहित आहे का?
प्रत्येक मंदिरावर कळस असण्यामागे काय कारण आहे जाणून घ्या.
मंदिरावर कळस असण्याची काही धार्मिक आणि पारंपरिक कारणे आहेत.
कळस हे देवाच्या अस्तित्वाचे आणि त्याच्या उपस्थितीचे निदर्शक आहे. कळस दर्शनाने देवाची कृपा प्राप्त होते, असे मानले जाते.
मंदिराच्या कळसाचे दर्शन घेतल्याने पापांचा नाश होतो, असे शास्त्रात म्हटले आहे.
कळसाच्या माध्यमातून मंदिराच्या वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, ज्यामुळे भाविकांना शांती आणि समाधान मिळण्यास मदत होते.
कळस हे भारतीय मंदिरांच्या स्थापत्यशैलीचा एक अविभाज्य भाग आहे. त्यामुळे मंदिरांवर कळस असणे हे एक पारंपरिक आणि धार्मिक संकेत आहे.
कळसाकडे पाहून देवाशी संवाद साधल्यासारखे वाटते. अशी मान्यता आहे
कळसाच्या मध्यभागी दैवी शक्तींचा वास असतो, असे मानले जाते.