Pranali Kodre
सिंधुदूर्ग जिल्ह्यातील एक प्रसिद्ध तालुका म्हणजे वेंगुर्ला. वेंगुर्ला हे तालुक्याचे गाव असून येथे सुंदर समुद्रकिनाराही आहे.
Vengurla, Sindhudurg
X/maha_tourism
कोकण किनारपट्टीवरील वेंगुर्ला हे महत्त्वाचे बंदर आहे.
Vengurla, Sindhudurg
X/maha_tourism
तसेच स्वातंत्र्यपूर्व काळातही आशिया खंडातील पश्चिम किनाऱ्यावरील हे आयात-निर्यातीचे प्रमुख व्यापारी केंद्र होते. पोर्तुगीज आणि डच अधिकाऱ्यांनी हे बंदर बनवून येथे सत्ता स्थापन केली होती.
Vengurla, Sindhudurg
X/maha_tourism
निळाशार समुद्र, हिरवागार परिसर आणि स्वच्छ हवा यामुळे वेंगुर्ला पर्यटनासाठीही एक उत्तम ठिकाण आहे.
Vengurla, Sindhudurg
X/maha_tourism
समुद्रकिनारा आणि बंदराशिवाय सागर बंगला, दीपगृह, क्रॉफर्ड मार्केटची प्रतिकृती असलेलं वेंगुर्ला मार्केट, दाभोली मठ, निशाण तलाव हे वेंगुर्ल्यातील पर्यटन स्थळं आहेत.
Vengurla, Sindhudurg
X/maha_tourism
वेंगुर्ल्याजवळच समुद्र किनाऱ्यावरील सारगेश्वर हे शिवमंदिरही पर्यटकांना आकर्षित करते.
Vengurla, Sindhudurg
Sakal
वेंगुर्ल्यात मासेप्रेमींना मासे खाण्याचा यथेच्छ आनंद घेता येतो. बंदराच्या ठिकाणी मासेमारी मोठ्या प्रमाणात होते. मासेमारीच्या हंगामात ताज्या मासळीचा आनंद घेता येतो.
Sea Food
Sakal
वेंगुर्ला हे तालुक्याचे ठिकाण असल्याने वाहतुक, निवास आणि भोजनाची उत्तम सोय येथे आहे. वेंगुर्ल्यात बसस्थानक असून जवळचे रेल्वेस्थानक सावंतवाडी रोड आहे.
Vengurla, Sindhudurg
X/maha_tourism
ऑक्टोबर ते मे हा कालावधी पर्यटनासाठी उत्तम आहे.
Vengurla, Sindhudurg
X/maha_tourism
Devgad, Sindhudurg
X/maha_tourism