पुजा बोनकिले
१३ सप्टेंबर रोजी मंगळ ग्रह तूळ राशीत प्रवेश करेल. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ४५ दिवसांच्या आत मंगळ ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो.
ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळ ग्रहाला ग्रहांचा सेनापती म्हटले जाते आणि तो धैर्य, आत्मविश्वास, शक्ती आणि उर्जेचा कारक देखील मानला जातो.
पंचांगानुसार, 13 सप्टेंबर रोजी रात्री 9:34 वाजता मंगळ शुक्राच्या राशी तूळ राशीत प्रवेश करेल. आणि जेव्हा जेव्हा शुक्र आणि मंगळ समोरासमोर येतात तेव्हा त्याचा परिणाम सर्व राशींवर सकारात्मक दिसून येतो. तर मग जाणून घेऊया 13 सप्टेंबर रोजी मंगळाच्या संक्रमणाचा फायदा कोणत्या राशींना होणार आहे.
मंगळाचे भ्रमण कर्क राशीच्या चौथ्या घरात असेल. तुम्ही तुमच्या नोकरीत चांगली कामगिरी कराल. व्यवसायात चांगले नाव कमवू शकाल आणि आर्थिक लाभही मिळेल. बचतीसाठी हा काळ चांगला मानला जातो.
मंगळाचे भ्रमण मकर राशीच्या दहाव्या घरात असेल. तुम्हाला वाढ आणि प्रगतीची संधी मिळेल. व्यवसायात नफा होईल.
13 सप्टेंबर रोजी मंगळाचे भ्रमण कुंभ राशीच्या नवव्या घरात असेल. कठोर परिश्रमामुळे तुम्हाला नोकरीत फायदा होईल. व्यवसायामुळे परदेशात जाण्याची शक्यता आहे. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल.
मंगळ सिंह राशीच्या तिसऱ्या घरात भ्रमण करणार आहे. व्यवसायाच्या सहलीला जाण्याची शक्यता आहे. तुमच्या नोकरीत काही सकारात्मक बदल दिसू शकतात. पैसे कमविण्यासाठी देखील हा चांगला काळ आहे.
Smartphone warning signs
Sakal