Apurva Kulkarni
संकष्टीला मोदकाला खुप महत्त्व असतं. अनेकवेळा आपण उकडीचे मोदक बनवतो. पंरतु यंदा अंब्याच्या फ्लेवरचा मोदक नक्की ट्राय करा.
Modak
esakal
सध्या उन्हाळा सुरु आहे. बाजारात आंबा दाखल झालाय. त्यामुळे उकडीचे मोदक बनवताना त्यात अंब्याचा फ्लेवर देऊन बघा.
Modak
esakal
या मोदकासाठी लागणारं साहित्य म्हणजे पिकलेला आंबा, किसलेलं ओलं खोबरं, गुळ, तूप, वेलची पावडर
Modak
esakal
सारणासाठी तुप तापवून किसलेले खोबरे आणि गूळ एकत्र करा. गूळ विरघळल्यावर त्यात आंब्याचा रस टाका आणि घट्ट होईपर्यंत ढवळा त्यात वेलची पाडवर टाका.
Modak
esakal
उकड तयार करण्यासाठी पाणी उकळवा त्यात थोडं तूप आणि मीठ टाकून तांदळाचा पीठ मिसळा. मऊ उकड तयार करा.
Modak
esakal
उकडीचे लहान गोळे घेऊन बोटांनी पातळ कणिक बनवा, मधोमध आंबा सारण भरून त्याला मोदकाचा आकर द्या.
Modak
esakal
मोदक दहा ते १५ मिनिटं वाफवा आणि तूप सोडून नैवेद्य दाखवा. बाप्पासह सगळ्यांना हा मोदक नक्की आवडेल.
Modak
esakal
Side effects of mango and curd combination
Sakal