घरच्या घरी बनवा रसाळ आणि दाणेदार 'आंबा कलाकंद'!

Aarti Badade

उन्हाळ्याची खास गोड मेजवानी

आंब्याचा सीझन सुरू आहे मग ट्राय करा हा शाही 'आंबा कलाकंद'. पिकलेल्या आंब्याचा गोडवा आणि माव्याचा दाणेदारपणा यामुळे ही मिठाई सर्वांनाच मनापासून आवडेल.

Mango Kalakand recipe

|

Sakal

साहित्याची तयारी

रेसिपी सुरू करण्यापूर्वी पिकलेल्या आंब्याचा पल्प, मावा (खवा), साखर, वेलची पावडर, थोडे तूप आणि सजावटीसाठी ड्रायफ्रूट्स तयार ठेवा.

Mango Kalakand recipe

|

Sakal

गुळगुळीत आंब्याचा पल्प

आंबा सोलून त्याचा मिक्सरमधून मऊ आणि गुळगुळीत पल्प तयार करून घ्या. पल्पमध्ये गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्या, यामुळे कलाकंदाचे टेक्स्चर एकदम मऊ येते.

Mango Kalakand recipe

|

Sakal

मावा परतण्याची कला

कढईत थोडे तूप गरम करा आणि त्यात मावा घालून मंद आचेवर परता. मावा हलका सोनेरी रंगाचा आणि सुगंधी होईपर्यंत परतणे महत्त्वाचे आहे, यामुळे कलाकंदाला खमंग चव येते.

Mango Kalakand recipe

|

Sakal

पल्प आणि साखर मिसळा

परतलेल्या माव्यात आंब्याचा पल्प आणि चवीनुसार साखर घाला. मध्यम आचेवर हे मिश्रण सतत ढवळत राहा. मिश्रण कढईला चिकटू नये म्हणून लक्ष देणे आवश्यक आहे.

Mango Kalakand recipe

|

Sakal

मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा

हळूहळू हे मिश्रण घट्ट होईल आणि कढईच्या कडा सोडू लागेल. याच टप्प्यावर वेलची पावडर घालून त्याचा सुगंध वाढवा. मिश्रण पूर्णपणे एकजीव झाल्यावर गॅस बंद करा.

Mango Kalakand recipe

|

Sakal

सेट करा आणि सर्व्ह करा!

तुपाचा हात लावलेल्या ट्रेमध्ये मिश्रण पसरवा, वरून ड्रायफ्रूट्स टाका आणि थंड होऊ द्या. सेट झाल्यावर चौकोनी काप करा. तयार आहे तुमचा घरगुती चविष्ट 'आंबा कलाकंद'!

Mango Kalakand recipe

|

Sakal

उन्हाळ्यातील किंग रेसिपी! रसाळ आंब्याचा आमरस बनवण्याची परफेक्ट पद्धत

Aamras Recipe

|

Sakal

येथे क्लिक करा