सकाळ डिजिटल टीम
ज्याप्रमाणे काही फळे आणि भाज्या आरोग्यासाठी रामबाण उपाय म्हणून काम करतात, त्याचप्रमाणे काही झाडांची पाने देखील औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असतात.
आंब्याची पाने आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जातात. आज या लेखात आम्ही आंब्याच्या पानांचे सेवन कसे करावे आणि त्याचे फायदे काय आहेत, हे जाणून घेऊ..
दररोज सकाळी रिकाम्या पोटी आंब्याच्या पानांचे पाणी पिल्याने शरीराची इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते, ज्यामुळे साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
हे चयापचय गतिमान करते आणि शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करते. फॅटी लिव्हर, लठ्ठपणा आणि उच्च कोलेस्ट्रॉल सारख्या समस्यांमध्ये देखील हे फायदेशीर आहे.
आंब्याच्या पानांमध्ये असलेले टॅनिन आणि अँथोसायनिन रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करतात. हे इन्सुलिनची पातळी संतुलित करण्यास मदत करते.
आंब्याच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ए असते, जे हृदय आणि डोळ्यांचे आरोग्य सुधारते.
यासाठी 10 ते 12 पाने रात्रभर एक ग्लास पाण्यात भिजवा. ते पाणी गाळून सकाळी रिकाम्या पोटी प्या..