सकाळ डिजिटल टीम
मांजर कोण कोणत्या गोष्टींना सर्वात जास्त घबरते जाणून घ्या.
Cat Fears
sakal
मांजरींच्या पूर्वजांचे वास्तव्य वाळवंटी भागात होते, जिथे त्यांचा पाण्याशी फारसा संबंध आला नाही. ओले झाल्यावर मांजरीचे केस जड होतात, ज्यामुळे त्यांना हालचाल करणे किंवा शत्रूपासून पळणे कठीण जाते. तसेच, ओल्या केसांमुळे त्यांच्या शरीराचे तापमान वेगाने कमी होते, जे त्यांना आवडत नाही.
Cat Fears
sakal
इंटरनेटवर काकडीला पाहून मांजर उडतानाचे अनेक व्हिडिओ आहेत. याचे कारण काकडी नसून 'अचानक आलेली वस्तू' हे आहे. मांजरीच्या दृष्टीने जमिनीवर पडलेली लांबट हिरवी वस्तू म्हणजे 'साप' असू शकतो. हा त्यांच्या अनुवांशिक भीतीचा भाग आहे.
Cat Fears
sakal
मांजरींची ऐकण्याची क्षमता मानवापेक्षा कित्येक पटीने जास्त असते. त्यांना अल्ट्रासोनिक आवाजही ऐकू येतात. त्यामुळे मिक्सर, व्हॅक्युम क्लीनर किंवा फटाक्यांचा आवाज त्यांच्यासाठी एखाद्या बॉम्बस्फोटासारखा असतो.
Cat Fears
sakal
मांजरी हे प्रादेशिक (Territorial) प्राणी आहेत. त्यांच्या हद्दीत कोणीही नवीन व्यक्ती आली की त्यांना असुरक्षित वाटते. जोपर्यंत त्यांना त्या व्यक्तीच्या वासाची ओळख होत नाही, तोपर्यंत त्या बचावात्मक पवित्रा घेतात.
Cat Fears
sakal
मांजरींची घ्राणशक्ती (वास घेण्याची क्षमता) अत्यंत तीव्र असते. लिंबू, संत्री किंवा मोसंबी यांसारख्या फळांचा वास त्यांना खूप उग्र आणि त्रासदायक वाटतो. निसर्गात अनेक विषारी वनस्पतींचा वास असाच उग्र असतो, त्यामुळे मांजरी अशा वासापासून लांब राहतात.
Cat Fears
sakal
प्राण्यांच्या जगात एकटक डोळ्यात बघणे हे 'आक्रमकतेचे' किंवा 'युद्धाचे' लक्षण मानले जाते. जर तुम्ही तुमच्या मांजरीकडे टक लावून पाहिले, तर तिला भीती वाटते किंवा ती तुमच्यावर हल्ला करू शकते.
Cat Fears
sakal
अनेकांना मांजरीला घट्ट पकडायला आवडते, पण मांजरींना 'अडकून पडल्यासारखे' वाटते. त्यांना जेव्हा स्वतःच्या हालचालीवर नियंत्रण राहत नाही, तेव्हा त्या घाबरतात आणि पळ काढण्याचा प्रयत्न करतात.
Cat Fears
sakal
जर तुम्ही बाहेरून दुसऱ्या प्राण्याला स्पर्श करून आलात, तर तुमच्या कपड्यांना लागलेला तो वास मांजरीला अस्वस्थ करतो. त्यांच्यासाठी तो गंध म्हणजे त्यांच्या प्रदेशात आलेला 'अदृश्य शत्रू' असतो.
sakal
Cat Fears
Dog Tail Curly
esakal