संतोष कानडे
मागच्या काही दिवसांमध्ये मराठवाड्यात चष्म्यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरु असल्याचं दिसतंय
मनोज जरांगे पाटलांनी धनंजय मुंडेंवर टीका करताना 'परळीचा चष्मा' असा टीपिकल उल्लेख केला
त्यांच्या 'चष्म्यावाला' या टिपण्णीला शुक्रवारी ओबीसी मेळाव्यात धनंजय मुंडेंनी उत्तर दिलं
माझा चष्मा एवढाच आवडतो तर घेऊन जा, असं धनंजय मुंडे म्हणाले. तसेच त्यांनी आपल्या डोळ्यांना काय त्रास होतो हेही सांगितलं
भाषणादरम्यान धनंजय मुंडेंनी चष्मा काढून आपल्या डोळ्यांना काहीही झालेलं नाही, असं म्हटलं
मला जसा चष्मा वपून दिसतो, तसा तुम्हाला दिसेल का? असंही धनंजय मुंडे म्हणाले होते
दरम्यान, शनिवारी धनत्रयोदशीच्या दिवशी मराठा सेवकांनी अंतरवली सराटीमध्ये खास घोडा आणला होता
या घोड्याची पूजा झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील घोड्यावर बसले आणि फोटोशूट केलं
केवळ घोड्यावर बसले नाहीत तर त्यांनी डोळ्यावर काळा गॉगल घातला होता.
मनोज जरांगे पाटलांचे हे फोटो व्हायरल झाले आहेत. मराठा बांधवांनी हातोहात फोटो शेअर केले