Anuradha Vipat
गेल्या काही दिवसांपूर्वी मानसी नाईकने आपण घटस्फोट घेत असल्याचे म्हणत सगळ्यांनाच धक्का दिला होता.
मानसी नाईक आणि तिचा पती प्रदिप खरेरा यांच्यातील वाद सोशल मीडियावर चर्चेत आले होते
त्यांच्यातील घटस्फोटाची प्रक्रिया सुरू होती. आता मानसीला घटस्फोट मिळाला आहे.
मानसी नाईक हिने नुकतेच पॅरिसच्या आयफेल टॉवरसमोर केलेलं फोटोशूट शेअर केलं आहे. यात तिने म्हटले की, ‘मी आता भूतकाळामधील सगळ्या गोष्टींमधून मुक्त झाले आहे.
घटस्फोटाचं कारण सांगत मानसी नाईक म्हणाली की, ‘सगळं काही खूपच जलद गतीने घडलं. परंतु, आजही माझा प्रेमावर विश्वास आहे
मानसी नाईकने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर प्रदीप खरेराला अनफॉलो केल्यापासून घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आले होते