kimaya narayan
भारतातील सगळ्यात मोठा गँगस्टर आणि डॉन म्हणजे दाऊद इब्राहिम. दाऊदविषयीच्या अनेक कथा ऐकिवात आहेत. पण तुम्हाला माहितीये का ? दाऊद क्रूर डॉन बनण्यामागे त्याच्या मोठया भावाचा मृत्यू हे खरं कारण होतं.
दाऊदचा मोठा भाऊ साबीर हा मुळात दाऊद गँगचा म्होरक्या होता. दाऊद कितीही क्रूर असला तरीही साबीरच्या शब्दाबाहेर नव्हता. पण साबिरचा खून झाला आणि सगळंच चित्र बदललं.
साबीरचा शहनाझ नावाच्या मुलीवर प्रेम होतं आणि तिच्याशी त्याने लग्न केलं. पण पुढे शहनाझ गरोदर असताना तो चित्रा नावाच्या वेश्येच्या प्रेमात पडला. तिची मैत्रीण असलेल्या नंदा नावाच्या वेश्येचा फायदा घेऊन एका व्यक्तीने साबीर विरोधात खूप मोठा कट रचला.
साबीर रात्री - अपरात्री चित्राला घेऊन बाहेर फिरायला जायचा. नंदाने ही खबर तिचा प्रियकर आमिरझादाला पोहोचवली जो त्याचा दुष्मन होता. त्यामुळे त्या रात्रीच साबीर विरोधात कट रचण्यात आला ज्याची खबर नंदालाही नव्हती.
साबीर आणि चित्रा पद्मीनी फियाट मधून ताडदेवला आले असताना एक सजवलेली मोटार पाठलाग करत असल्याचं त्याच्या लक्षात आलं पण त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं. पेट्रोल भरण्यासाठी तो प्रभादेवीला गेला तेव्हा ती गाडीही त्याच्या मागोमाग आली आणि क्षणार्धात त्या सजवलेल्या गाडीतून काही लोक उतरली. त्यांनी चित्राला बाहेर काढलं आणि आत बसलेल्या साबीरवर गोळ्यांचा वर्षाव केला.
या पूर्ण हत्याकांडाचा मास्टरमाईंड मराठमोळा गँगस्टर मन्या उर्फ मनोहर सुर्वे. त्यानेच पठाणांना हाताशी धरून साबीरच्या हत्येचा प्लॅन आखला होता. गाडी फुलांनी सजवण्याची कल्पानाही त्याचीच होती.
मन्याला जेम्स हॅडली चेसच्या रहस्यकथा वाचण्याचा नाद होता. त्यातूनच त्याने हा प्लॅन आखला होता.
पण साबीरच्या हत्येनंतर मन्या आणि दाऊद कायमचे दुष्मन झाले. अखेर दाऊदच्याच टीपमुळे मन्या सुर्वेंची हत्या झाली.