सकाळ डिजिटल टीम
औरंगजेबाच्या आक्रमणानंतर स्वराज्य संकटात असताना नावजी बलकवडे यांनी पुन्हा अनेक किल्ले जिंकून इतिहास रचला.
छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर रायगड, राजगड, पुरंदर, सिंहगड मुघलांच्या ताब्यात गेले.
मुघलांच्या आक्रमणात राजाराम महाराजांना दक्षिणेतील जिंजीवर आश्रय घ्यावा लागला.
या संकटात सरदार नावजी बलकवडे यांनी सिंहगड, लोहगड व कोरीगड पुन्हा स्वराज्यात आणले.
नावजी बलकवडे यांनी कुर्डुघाटात सिद्दी आणि जांभुळने येथे मन्सूरखान बेगचा पराभव केला
सिंहगड पहिल्यांदा तानाजी मालुसरे यांनी जिंकला होता. पुढे तो मुघलांकडे गेला.
याच दिवशी नावजी बलकवडे यांनी सिंहगड पुन्हा स्वराज्यात आणला.
छत्रपती राजाराम महाराजांनी ३ एप्रिल १६९४ रोजी कौतुकाचे पत्र पाठवले.
या पराक्रमासाठी त्यांना पवना मावळातील सावरगाव इनाम म्हणून देण्यात आले.
स्वराज्य रक्षणासाठी झटणाऱ्या नावजी बलकवडे यांचा पराक्रम इतिहासात अजरामर आहे.