संतोष कानडे
मराठा आरक्षणासाठी मंगळवारी विधीमंडळाचं विशेष अधिवेशन संपन्न होत आहे
मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय सरकार घेण्याच्या तयारीत आहे
परंतु हे आरक्षण फसवं ठरु नये, असं म्हणत आमदार धीरज देशमुख यांनी 'फसवणूक नको आरक्षण हवे' असं लिहिलेलंट जॅकेट घातलं होतं.
मनोज जरांगे पाटील यांनी मात्र नाराजी व्यक्त करत ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे, ही भूमिका घेतलीय
सगेसोयऱ्यांच्या बाबतीत काढलेल्या अधिसूचनेचा कायदा करावा, अशी जरांगेंनी मागणी केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या अधिवेशनाचा मराठा समाजाला फायदा होतो का, असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठ्यांना आरक्षण देण्याचा शब्द दिला होता. फेब्रुवारीत विशेष अधिवेशन बोलावले जाईल, असं हिवाळी अधिवेशनात सांगितलं होतं.
त्यानुसार मंगळवारी विशेष अधिवेशन संपन्न होत आहे. आंदोलक जरांगे पाटील हे उद्या पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करणार आहे.