बनावट जिरे कसे ओळखायचे?

सकाळ डिजिटल टीम

तुम्ही फोडणीत जे जिरे वापरत आहात ते बनावट तर नाही ना.. याची खात्री करून घ्या.

कारण बाजारात अर्ध्या किमतीत मिळणारे जिरे अनेकांच्या मसाल्या डब्यापर्यंत पोहचले आहे.

हॉटेल, धाब्यांमध्ये बनावट जिऱ्याचा बोलबाला असल्याची धक्कादायक बाब भिवंडीत उघडकीस आली आहे.

पालघरवरून भिवंडीत विक्रीसाठी आलेले ७ लाख १९ हजार ७०० रुपये किमतीचे तब्बल २ हजार ३९९ किलो जिरे शांतिनगर पोलिसांनी रविवारी जप्त केले

भिवंडी पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी बनावट जिरे कसे ओळखायचे याचे प्रात्यक्षिक करून दाखवले आहे

प्रत्येकाने घरी हा ‘प्रयोग’ केला तर बनावट जिरे झटक्यात ओळखले जाऊ शकतात

बनावट जिरे पाण्यात टाकले तर ते मळकट रंगाचे दिसतात आणि पाणीही गढूळ होते

अस्सल जिरे पाण्यात टाकले तर ते स्वच्छ आणि पिवळसर रंगाचे दिसतात

नेहाने सांगितलं मनातलं दुःख

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Neha Sharma | esakal