Apurva Kulkarni
संतोष जुवेकर हा मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रतिभावान अभिनेता आहे, ज्याने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
'या गोजिरवाण्या घरात' या मालिकेमुळे संतोषला घराघरात ओळख मिळाली. त्याने 'झेंडा' चित्रपटात संतोष चौधरी ही भूमिका साकारून महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींवर आधारित चित्रपटात आपला ठसा उमटवला.
'रेगे' आणि 'शाळा' सारख्या चित्रपटांमध्ये त्याच्या अभिनयाची वेगळी छाप पडली असून, तो नव्या पिढीतील अभिनेत्यांमध्ये अग्रस्थानी आहे.
2004 मध्ये रंगभूमीवरून अभिनयाची सुरुवात करणाऱ्या संतोषने आपल्या कारकिर्दीची सुरुवात 'आणि मकरंद राजाध्यक्ष' या नाटकातून केली.
संतोष जुवेकर याला सुरुवातीच्या काळात संघर्ष करावा लागला असून, एका काळी त्याला एक वेळच्या जेवणासाठीही झगडावे लागले होते.
'छावा' चित्रपटातील त्याच्या भूमिकेपेक्षा त्याच्या वक्तव्यांमुळे तो अधिक चर्चेत आला आहे.
त्याने अलीकडेच एका मुलाखतीत सांगितले की, शूटिंगदरम्यान त्याने औरंगजेबाची भूमिका करणाऱ्या अक्षय खन्नाशी संवाद साधला नाही.
संतोष जुवेकर हा सध्या 'रावरंभा' या ऐतिहासिक चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असून, या चित्रपटाची निर्मिती शशिकांत पवार करत आहेत.
‘एसीपी प्रदीप राजे’ या वेबसीरिजमध्ये त्याने प्रमुख भूमिका साकारली असून, त्याची ही भूमिका देखील विशेष चर्चेत राहिली
मराठी रंगभूमी, टेलिव्हिजन आणि चित्रपटसृष्टीत संतोष जुवेकरने आपली वेगळी ओळख निर्माण केली असून, त्याचा अभिनय आजही रसिकांना भावतो.