kimaya narayan
अभिनेता सनी देओलचा गदर हा सिनेमा खूप गाजला. अमिषा पटेलचीही या सिनेमात मुख्य भूमिका होती.
या सिनेमातील 'में निकला गड्डी लेके' हे गाणं खूप गाजलं. या गाण्यात एका मराठी अभिनेत्री आणि निर्मीतीने काम केलं आहे.
उदित नारायण यांनी हे गायलं होतं. आजही हे गाणं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतं.
या गाण्यात काम करणारी मराठी अभिनेत्री आहे श्वेता शिंदे. या सिनेमातूनच अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं.
श्वेताच्या मैत्रिणी तिच्या घरच्यांना सांगून तिला शिमला ट्रीपला घेऊन गेल्या. पण जेव्हा ती तिथे पोहोचली तेव्हा तिला सिनेमाच्या सेटवर नेण्यात आलं. तेव्हा तिला समजलं सिनेमाचं शूटिंग आहे.
त्यानंतर श्वेताने फॅशन शो आणि मालिकांमध्ये काम करायला सुरुवात केली. तिथूनच तिचा अभिनयक्षेत्रात प्रवेश झाला.
चार दिवस सासूचे या मालिकेमुळे श्वेताला ओळख मिळाली पण आता मराठी मनोरंजनविश्वातील आघाडीची निर्माती आहे.