Apurva Kulkarni
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचा मोठा चाहतावर्ग आहे. ती नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहते.
दरम्यान सोनालीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही फोटो, व्हिडिओ शेअर केले आहेत. चाहत्यांना ते प्रचंड भावले आहेत.
सोनालीने मरिन ड्राइव वरचे काही फोटो चाहत्यांना शेअर केले आहे. या फोटोमध्ये ती खूप आनंदी दिसतेय.
तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने गुलाबी रंगाची साडी परिधान केली आहे. तसंच तिने केस मोकळे सोडले आहेत.
मरिन डाईव्हर फुल्ल मजामस्ती करताना दिसत आहे. चाहत्यांना तिचे फोटो प्रचंड भावले आहेत.
तिने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत छान कॅप्शन दिलं आहे. 'जुलै आणि मुंबई' असं कॅप्शन दिलय. तसंच पावसाचे इमोजी सुद्धा लावलेत.
समुद्राच्या लाटा या पहिलं पाण्यात उतरण्याचं ऑप्शन असल्याचंही तिने कमेंट करत म्हटलय.
अभिनेत्री प्रार्थना बेहरेसह अनेक कलाकारांनी तिच्या फोटोला पसंती दाखवली आहे.