Pranali Kodre
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान प्रेमाची गोष्ट ही मालिका अचानक सोडण्याचा निर्णय घेतल्याने चर्चेत आहे.
तेजश्रीने आत्तापर्यंत काही हिट मालिकांमध्ये काम केले आहे.
तसेच तिने काही मराठी चित्रपटामध्येही भूमिका साकारल्या आहेत, ज्यात ती सध्या काय करते, लग्न पहावे करून या चित्रपटांचाही समावेश आहे.
तेजश्री ही इतर भारतीयांप्रमाणेच क्रिकेटची मोठी चाहती आहे.
तिने काही वर्षांपूर्वी तारांगणला दिलेल्या मुलाखतीत क्रिकेटबद्दलचं प्रेम व्यक्त केलं होतं. ती कामात असली तरी स्कोअर विचारत असते असं तिने सांगितलं होतं.
तेजश्रीने यात तिच्या आवडत्या क्रिकेटपटूबद्दलही खुलासा केला होता.
तेजश्रीने सांगितले होते की तिला लहानपणापासून ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ब्रेट ली आवडतो. ती त्याला लहानपणापासून पाहत आली आहे.
तिने पुढे सांगितले की ब्रेट लीनंतर मग तसा अजिंक्य रहाणेही तिचा आवडता खेळाडू आहे.