Pranali Kodre
जेष्ठ गायिका आशा भोसले यांची नात झनाई भोसले हिचा नुकताच २३ वा वाढदिवस झाला.
तिने मुंबईत तिचा वाढदिवस जल्लोषात साजरा केला. यावेळी आशा भोसले यांच्यासह अनेक सेलिब्रेटी उपस्थित होते.
तिनेच वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये तिच्यासोबत आशा भोसले या देखील फोटोंमध्ये दिसत आहेत.
त्यातही एका फोटोने सर्वांचे लक्ष वेधले आहे, ज्यात ती भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज सोबत दिसत आहे.
त्यामुळे झनाई आणि सिराज एकमेकांसोबत डेटिंग करत आहेत का, असे प्रश्नही अनेक युझर्सने उपस्थित केले आहेत.
मात्र, असे प्रश्न उपस्थित झाल्यानंतर आता झनाई आणि सिराज यांनी इंस्टाग्राम स्टोरीवर त्यांचं भाऊ-बहिणीचं नातं असल्याचं स्पष्ट केलं आहे.
झनाईने इंस्टाग्राम स्टोरीवर 'मेरे प्यारे भाई' असं लिहिलंय, तर सिराजनेही माझी बहिण एक हजारात एकमेव आहे अशा अर्थाचा एक छोट्या कवितेच्या ओळी टाकल्या आहेत.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी झनाईने भारतीय क्रिकेटपटू श्रेयस अय्यर आणि सिद्धेश लाड यांच्यासोबतही फोटो शेअर केले आहेत.