रात्री कुणी पाजली आठवत नाही, मतदाराचं भन्नाट उत्तर...१० मराठी जोक वाचा

Sandip Kapde

देव – मी तुझ्यावर प्रसन्न आहे. काय पाहिजे…?
गण्या – पैशांनी भरलेली Bag, नोकरी आणि
एक मोठ्ठी गाडी ज्यामध्ये खूप सुंदर मुली असतील.
देव – तथास्तु
(गण्या आता कंडक्टर आहे)

Marathi Joke | esakal

पोलीस – काय रे कुठे चाललाय एवढ्या रात्री…?
बंड्या – प्रवचन ऐकायला…
पोलीस – कोणत्या विषयावर प्रवचन आहे…?
बंड्या – दारूपासून होणारे दुष्परिणाम
पोलीस – एवढ्या रात्री कोण देत प्रवचन…?
बंड्या – माझी बायको…

Marathi Joke | esakal

यजमान – आम्ही दार्जीलिंगचा चहा वापरतो
पुणेकर – वा , तरीच छान थंड होता. . .

Marathi Joke | esakal

काल एकाला उधारी मागण्यासाठी
घरच्या लँडलाईन वर फोन केला,
तर तो म्हणतो,
“अरे यार, थोडा वेळाने फोन कर…
मी आता गाडी चालवतोय…..”

Marathi Joke | esakal

नवरा – जर मी नेता झालो ना,
तर आख्या देशाला बदलून टाकील…
बायको – जरा कमी पेत जा…
लुंगी समजून माझी साडी नेसली तुम्ही…
ती बदला आधी…!!!

Marathi Joke | esakal

शिक्षक – “मी तुझा जीव घेईन”
याच इंग्रजीत भाषांतर कर…
पप्पू – ते इंग्रजी गेलं उडत…
तुम्ही हात तरी लाऊन बघा…

Marathi Joke | esakal

शाळेत इंग्लिश चे लेक्चर चालू असते.
मास्तर – गण्या “It” केव्हा वापरतात?
गण्या – घर बांधताना…!
(लई चोपला मास्तरांनी)

Marathi Joke | esakal

एक मतदार वोटिंग मशीन समोर बराचवेळ उभा असतो
मतदान अधिकारी – काय झालं?
मतदार – रात्री कुणी पाजली त्याचं नावंच आठवत नाहीये…!

Marathi Joke | esakal

बायको – अहो, उठा,
मला करंज्या तळायच्या आहेत.
नवरा – मग, मी काय
कढईत झोपलो आहे का…?

Marathi Joke | esakal

गुरुजी – गण्या,
मी तुला कानफटीत मारली.
ह्याचा भविष्यकाळ सांग बघू?
गण्या – जेवनाच्या सुट्टीत तुमची गाडी पंक्चर होनार…!

Marathi Joke | esakal

'निकिता'बद्दल माहिती नसलेल्या गोष्टी जाणून घ्या

Nikita Dutta | esakal