Vinayan
आज ५ नोव्हेंबर! महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आज 'मराठी रंगभूमी दिन' साजरा होतोय; पण या दिवसामागे १८४३ सालची एक ऐतिहासिक रात्र दडली आहे.
The history of Vishnudas Bhave Natyagriha
Sakal
सांगली संस्थानचे राजे श्रीमंत चिंतामणराव पटवर्धन यांच्या दरबारात ५ नोव्हेंबर १८४३ रोजी विष्णूदास भावे यांनी मराठीतील पहिले नाटक रंगमंचावर सादर केले होते.
The history of Vishnudas Bhave Natyagriha
Sakal
कर्नाटकातील पारंपारिक 'यक्षगान' कलेपासून प्रेरणा घेऊन विष्णूदास भावे यांनी 'सीता स्वयंवर' या पौराणिक नाटकाची निर्मिती केली आणि मराठी रंगभूमीचा पाया रचला गेला.
The history of Vishnudas Bhave Natyagriha
Sakal
रंगमंचावर जिवंत पात्रे, संवाद आणि संगीताची ही अनोखी जादू पाहून प्रेक्षक अक्षरशः भारावून गेले. इथूनच मराठी माणसाच्या नाट्यवेडाचा प्रवास सुरू झाला.
The history of Vishnudas Bhave Natyagriha
Sakal
'सीता स्वयंवर'च्या प्रचंड यशानंतर विष्णूदास भावे यांनी १८५३ मध्ये 'सांगलीकर नाटक मंडळी' स्थापन केली आणि संपूर्ण महाराष्ट्र व देशात नाटकांचे दौरे सुरू केले.
The history of Vishnudas Bhave Natyagriha
Sakal
या ऐतिहासिक आठवणी जतन करण्यासाठी सांगलीत 'विष्णूदास भावे नाट्यमंदिर' उभारण्यात आले असून नाट्यप्रेमींसाठी सांगली हे आजही श्रद्धेचे तीर्थक्षेत्र मानले जाते.
The history of Vishnudas Bhave Natyagriha
Sakal
१९५९ पासून दरवर्षी ५ नोव्हेंबरला नाट्यसेवेसाठी मानाचा 'विष्णूदास भावे गौरव पुरस्कार' दिला जातो. या सर्वोच्च पुरस्काराचे पहिले मानकरी साक्षात 'नटसम्राट बालगंधर्व' होते!
The history of Vishnudas Bhave Natyagriha
Sakal
१८४३ ते २०२६... आज मराठी रंगभूमीला तब्बल १८३ वर्षे पूर्ण झाली आहेत! जगभरात मराठीचा डंका वाजवणाऱ्या आपल्या रंगभूमीला आणि सर्व नाट्यकर्मींना रंगभूमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
The history of Vishnudas Bhave Natyagriha
Sakal
Historical chronicle of the Navy
Sakal