मराठी संगीत रंगभूमीतील तेजस्वी नाव! जाणून घ्या बालगंधर्वांविषयी...

सकाळ डिजिटल टीम

मूळ नाव 'नारायण राजहंस'

त्यांचे मूळ नाव 'नारायण श्रीपाद राजहंस' असे होते, पण लोकमान्य टिळकांनी दिलेल्या एका पदवीने त्यांचे मूळ नाव मागे पडून 'बालगंधर्व' हेच नाव जगात अजरामर झाले.

Original Name: 'Narayan Rajhans'

|

sakal 

टिळकांकडून 'बालगंधर्व' पदवी

वयाच्या दहाव्या वर्षी नारायणरावांचे अद्भूत गाणे ऐकून लोकमान्य टिळक भारावून गेले. त्यांनी दिलेली 'बालगंधर्व' ही पदवी पुढे मराठी रंगभूमीचा श्वास बनली.

'Balgandharva': Bestowed upon him by Lokmanya Tilak

|

sakal 

वयाच्या १९ व्या वर्षी पदार्पण

स्त्री नट्या नसण्याच्या काळात, वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी त्यांनी 'शकुंतला' साकारली. त्यांच्या रूपाने मराठी रंगभूमीला तिचे पहिले 'स्त्री-सौंदर्य' लाभले.

Stage Debut: At the young age of 19

|

sakal 

अजरामर नाटके

'सौभद्र', 'मानापमान' ते 'एकच प्याला'पर्यंतच्या नाटकांत त्यांनी रुक्मिणी, भामिनी, सुभद्रा अशा भूमिका हुबेहूब जिवंत करत ५००० हून अधिक प्रयोग गाजवले.

Immortal Plays

|

sakal 

फॅशनचे पहिले 'आयडॉल'

रंगमंचावरील त्यांची साडी नेसण्याची पद्धत आणि दागिने पाहून तत्कालीन महिला तशाच फॅशनच्या साड्या खासर ऑर्डर देऊन बनवून घेत असत.

Fashion's First 'Icon': A trendsetter of his era

|

sakal 

स्वतःची नाटक कंपनी

१९१३ मध्ये स्थापन केलेल्या 'गंधर्व संगीत मंडळी'त अस्सल रंगभूषा, भव्य नेपथ्य आणि संगीताचा सुवर्णकाळ त्यांनी रसिकांसमोर उभा केला.

Gandharva Natak Mandali

|

sakal 

रुपेरी पडद्यावरील प्रयोग

व्ही. शांताराम यांच्या 'धर्मात्मा' (१९३५) चित्रपटात त्यांनी 'संत एकनाथ' ही पुरुष भूमिका, तर 'साध्वी मीराबाई'मध्ये मुख्य स्त्री भूमिका साकारली.

His experiments in cinema

|

sakal 

अनोखी स्वरसाधना

नाट्यगीतांसोबतच ख्याल, ठुमरी, गझल आणि भक्तिगीत या सर्वच गायन प्रकारांवर हुकूमत गाजवणारे ते अष्टपैलू गायक-अभिनेते होते.

Unique Devotion to Music

|

sakal 

'पद्मभूषण' आणि अजरामर स्मारक

त्यांच्या थोर कलासेवेसाठी भारत सरकारने १९६४ मध्ये 'पद्मभूषण' दिले, तर पुण्यात त्यांचे 'बालगंधर्व रंगमंदिर' हे स्मारक दिमाखात उभे राहिले.

'Padma Bhushan' and an Eternal Memoria

|

sakal 

आणखी वाचा