मराठवाड्यात दर दोन-तीन वर्षांनी दुष्काळ का पडतो?

सकाळ डिजिटल टीम

नैसर्गिकरीत्या 'पर्जन्यछायेचा प्रदेश'

मान्सूनचे वारे सह्याद्री पर्वतरांगांमध्ये अडवल्याने कोकणात मुसळधार पाऊस पडतो, पण मराठवाड्यात पोहोचेपर्यंत बाष्प कमी होऊन पाऊस अत्यंत कमी होतो.

Marathwada Drought

|

sakal 

क्षेत्रफळाच्या तुलनेत कमी पाणी

महाराष्ट्राचे २७% क्षेत्रफळ असलेल्या मराठवाड्याला फक्त ८% पाणी मिळते, तर विदर्भ अन् पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत प्रतिहेक्टरी सिंचन पाणी खूपच कमी आहे.

Marathwada Drought

|

sakal 

पीक पद्धती

कमी पाण्याचा प्रदेश असूनही ज्वारी-बाजरीऐवजी उसासारख्या जास्त पाणी लागणाऱ्या पिकांची लागवड वाढल्याने पाण्याचा प्रचंड तुटवडा निर्माण होतो.

Marathwada Drought

|

sakal 

भूगर्भातील पाण्याचा अतिउपसा

कडक बेसॉल्ट खडकामुळे जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण कमी आहे; त्यातच बोअरवेलद्वारे पाण्याचा प्रचंड उपसा झाल्याने भूजल पातळी धोकादायक पातळीवर गेली आहे.

Marathwada Drought

|

sakal 

जायकवाडी अन् हक्काच्या पाण्याचा संघर्ष

ऊर्ध्व भागातील धरणांमध्ये पाणी अडवल्याने आणि समन्यायी पाणीवाटपाचे नियम वेळेवर न पाळल्याने जायकवाडीसह मराठवाड्याला हक्काच्या पाण्यापासून वंचित राहावे लागते.

Marathwada Drought

|

sakal 

गळतीचे आव्हान

मराठवाड्यात ६.१७ लाख हेक्टर सिंचन क्षमतेची कमतरता असून कालव्यांच्या दयनीय अवस्थेमुळे धरणातील तब्बल ४०% पाणी शेतापर्यंत पोहोचण्याआधीच वाया जाते.

Marathwada Drought

|

sakal 

पश्चिम वाहिनी नद्या

पश्चिम वाहिनी नद्यांचे १६८.७५ टीएमसी पाणी नदीजोड प्रकल्पाद्वारे मराठवाड्याकडे वळवण्याची योजना अडकल्याने एक थेंबही पाणी मिळालेले नाही.

Marathwada Drought

|

sakal 

राजकीय उदासीनता

मराठवाड्याच्या पाणीप्रश्नासाठी पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्वपक्षीय एकमुखी राजकीय ताकद न उभारल्याने अनेक महत्त्वाचे जलप्रकल्प वर्षानुवर्षे अपूर्ण आहेत.

Marathwada Drought

|

sakal 

एल निनो अन् मान्सूनचा बदलता पॅटर्न

जागतिक तापमानवाढ आणि 'एल निनो'च्या प्रभावामुळे पावसाचे दिवस कमी झाले असून, कमी वेळेत अतिवृष्टी किंवा प्रदीर्घ पावसाचा खंड पडण्याचे प्रमाण वाढले आहे.

Marathwada Drought

|

sakal 

दुष्काळमुक्ती शक्य?

आंतरखोरे पाणीवहन, समन्यायी वाटप, आधुनिक वितरण व्यवस्था आणि एकात्मिक पाणलोट विकास, मिशन मोडवर राबवल्यास मराठवाडा दुष्काळमुक्त होऊ शकतो.

Marathwada Drought

|

sakal 

नेपाळ देशात 'स्वातंत्र्यदिन' का साजरा होत नाही?

Why Nepal Has No Independence Day

|

sakal 

आणखी वाचा