नेपाळ देशात 'स्वातंत्र्यदिन' का साजरा होत नाही?

सकाळ डिजिटल टीम

'स्वातंत्र्यदिन' नाही

नेपाळ देशात कधीही 'स्वातंत्र्यदिन' साजरा होत नाही; कारण तो कधी कोणत्याही परकीय राजवटीच्या अंमलाखाली आलाच नाही. त्यामुळेच नेपाळमध्ये भारतासारखा स्वातंत्र्यदिन नसतो.

Why Nepal Has No Independence Day

|

sakal 

कधीही न झुकणारा देश

जगातील बहुतांश देशांवर कधी ना कधी परकीय सत्तांनी कब्जा केला; पण आपल्या शेजारील नेपाळ देश इतिहासात कधीही कोणाचाही गुलाम झाला नाही.

Why Nepal Has No Independence Day

|

sakal 

हिमालयाचे नैसर्गिक संरक्षण

नेपाळ चारही बाजूंनी उंच पर्वत आणि दाट जंगलांनी वेढलेला असल्याने शत्रू सैन्याला तेथे दारूगोळा अन् आधुनिक शस्त्रांसह चढाई करणे अशक्य ठरले.

Why Nepal Has No Independence Day

|

sakal 

गोरखा सैनिकांचे असीम शौर्य

पारंपरिक 'कुकरी' शस्त्राच्या जोरावर आणि अद्वितीय लढाऊ क्षमतेमुळे गोरखा सैनिकांनी इंग्रजांच्या आधुनिक सैन्यालाही मागे हटण्यास भाग पाडले.

Why Nepal Has No Independence Day

|

sakal 

१८१४ चे अँग्लो-नेपाळ युद्ध

भारतावर कब्जा केल्यानंतर ब्रिटिशांनी नेपाळवर आक्रमण केले; यातूनच १८१४ ते १८१६ दरम्यान दोन्ही सैन्यांत तब्बल दोन वर्षे घनघोर युद्ध चालले.

Why Nepal Has No Independence Day

|

sakal 

१८१६ चा सुगौली करार

दीर्घ संघर्षानंतर १८१६ मध्ये दोन्ही बाजूंमध्ये 'सुगौलीचा करार' झाला, ज्याद्वारे इंग्रजांनी नेपाळचे स्वातंत्र्य आणि संप्रभुता औपचारिकपणे मान्य केली.

Why Nepal Has No Independence Day

|

sakal 

कुमाऊँ-गडवाल

करारानुसार नेपाळला कुमाऊँ आणि गडवालसारखा काही भाग ब्रिटिशांना द्यावा लागला, पण देशावर थेट परकीय राजवट कधीही येऊ दिली नाही.

Why Nepal Has No Independence Day

|

sakal 

'गोरखा रेजिमेंट'

करारानंतर नेपाळने इंग्रजांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवत ब्रिटिश सैन्यात गोरखा सैनिकांच्या भरतीला संमती दिली, जी पुढे प्रसिद्ध 'गोरखा रेजिमेंट' बनली.

Why Nepal Has No Independence Day

|

sakal 

पेशव्यांना शनिवारवाडा बांधण्याची कल्पना कोणत्या किल्ल्यावरून सुचली?

The Historic Indori Fort in Maval That Inspired Shaniwar Wada

|

sakal 

आणखी वाचा