Monika Shinde
मार्गशीर्ष महिना हिंदू पंचांगानुसार कार्तिकानंतर सुरू होतो. या महिन्यात दर गुरुवारी उपवास करणे व्रतींना अत्यंत फलदायी मानले जाते. लक्ष्मी व्रताचा प्रारंभ यंदा 27 नोव्हेंबरपासून आहे.
या महिन्यात चार गुरुवार येतात. प्रत्येक गुरुवारी महिलांनी घरात घट मांडून महालक्ष्मीची पूजा करून उपवास करणे हा परंपरागत मार्ग आहे. व्रताने घरात समृद्धी, वैभव आणि सुख प्राप्त होते.
मार्गशीर्ष महिन्यात एकूण चार गुरुवार येतात – 27 नोव्हेंबर, 4 डिसेंबर, 11 डिसेंबर आणि 18 डिसेंबर. या दिवशी व्रत करण्यास विशेष धार्मिक महत्व आहे.
गुरुवारी उपवासासाठी सकाळी लवकर उठावे आणि स्वच्छ स्नान करावे. नंतर घरात लाल कापड पसरवून तांब्याचा कलश ठेवावा. कलशात पाणी, दुर्वा, सुपारी आणि नाणे घालावे.
कलशावर पंचपत्री, विड्याची पाने आणि श्रीफळ ठेवा. पाटावर तांदूळ, खोबरे, फळे, गूळ, खडीसाखर ठेऊन लक्ष्मी देवीचा फोटो ठेवून पूजा विधीवंत करून आरती करा.
व्रत सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पाळावे. या दिवशी कथा वाचणे, नैवेद्य दाखवणे आणि मंत्रोच्चार केल्याने लक्ष्मी देवीची कृपा अधिक मिळते. उपवासाने घरात ऐश्वर्य, सुख आणि समृद्धी येते.
मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णाला आवडतो, तसेच धार्मिक ग्रंथानुसार या महिन्यात केलेले पुण्याचे कार्य विशेष फलदायी ठरते. गुरुवार व्रतामुळे भक्तांना लक्ष्मी-नारायणाची कृपा प्राप्त होते.