Mayur Ratnaparkhe
व्हेनेझुएलाच्या प्रख्यात राजकारणी मारिया कोरिना मचाडो यांना नोबेल शांतता पुरस्कार 2025 जाहीर झाला आहे.
मारिया कोरिना मचाडो सध्या व्हेनेझुएलातील विरोधी पक्षाच्या नेत्या आहेत आणि लोकशाही आणि मानवी हक्कांसाठी लढत आहेत.
मचाडो यांनी नोबेल शांतता पुरस्कार मिळवत, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का आहे.
मारिया कोरिना मचाडो यांनी २०११ ते २०१४ पर्यंत व्हेनेझुएलाच्या राष्ट्रीय सभेच्या निवडून आलेल्या सदस्या म्हणून काम केले आहे.
मारिया कोरिना मचाडो या व्हेनेझुएलाच्या सध्याच्या सरकारविरुद्ध लोकशाही चळवळीचे नेतृत्व करत आहेत.
मारिया यांचा जन्म ७ ऑक्टोबर १९६७ रोजी झाला आणि त्या औद्योगिक अभियंता आहेत.
नोबेल शांतता पुरस्कारापूर्वी मारिया कोरिना मचाडो यांना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
मारिया यांना २०२४ मध्ये युरोपियन युनियनचा सखारोव्ह पुरस्कार तसेच सर्वोच्च मानवाधिकार पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
Nobel Prize History
Esakal