नोबेलच्या इतर पुरस्कारांपेक्षा शांतता पुरस्काराचं महत्त्व जास्त, कारण काय? निवडीची पद्धत अन् वितरणही असतं वेगळं

सूरज यादव

नोबेल पुरस्कार

डायनामाइट सारख्या शक्तिशाली स्फोटकाचा शोध लावणाऱ्या आल्फ्रेड नोबेल यांच्या नावानं वेगवेगळ्या क्षेत्रात जगाच्या कल्याणासाठी कार्य करणाऱ्या लोकांना नोबेल पुरस्कार दिले जातात.

Nobel Prize History

|

Esakal

डायनामाइटचा विध्वंसक वापर

आल्फ्रेड यांनी डायनामाइटचा शोध चांगल्या कामासाठी लावला पण याचाच वापर पुढे विध्वंसासाठी करण्यात आला. यामुळे व्यथित झालेल्या नोबेल यांनी त्यांची संपत्ती पुरस्कारासाठी दान केली.

Nobel Prize History

|

Esakal

शांतता पुरस्कार प्रतिष्ठेचा

नोबेल यांनी इतर पुरस्कारांपेक्षा शांतता पुरस्काराला जास्त महत्त्व दिलं. देश आणि समाजात शांतता, बंधुभाव आणि सहकार्याला प्रोत्साहन देणाऱ्याला हा पुरस्कार द्यावा असं नोबेल यांनी मृत्यूपत्रात म्हटलंय.

Nobel Prize History

|

Esakal

ओस्लोत वितरण

ओस्लो इथं नोर्वेजियन नोबेल संस्थेकडून शांतता पुरस्काराची आज घोषणा होत आहे. नोबेलचे इतर क्षेत्रातले पुरस्कार हे स्वीडनमध्ये दिले जातात. पण शांतता पुरस्कार हा नॉर्वेतच दिला जातो.

Nobel Prize History

|

Esakal

नॉर्वेची संसद ठरवते समिती

आल्फ्रेड नोबेल यांनी नॉर्वेच्या संसदेला नोबेल शांतता पुरस्कार समिती स्थापन करण्याचे अधिकार दिलेत. या समितीकडून जगात शांतता प्रस्थापित करणाऱ्या आणि मानवाधिकारासाठी काम करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेची पुरस्कारासाठी निवड केली जाते.

Nobel Prize History

|

Esakal

उत्तर युरोपातला देश

नॉर्वे हा देश उत्तर युरोपातील स्कॅन्डिनेव्हियन बेटाच्या पश्चिम भागात असलेला देश आहे. जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठ्या देशांच्या यादीत ६७व्या क्रमांकावर आहे.

Nobel Prize History

|

Esakal

नॉर्वे शांतताप्रिय देश

आल्फ्रेड नोबेल हे नॉर्वेला शांतता प्रिय देश मानायचे. तसंच हा पुरस्कार पुर्णपणे निष्पक्ष आणि स्वतंत्रपणे दिला जावा हा उद्देश होता.

Nobel Prize History

|

Esakal

कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्य कसं जपावं?

mental health | Sakal
इथं क्लिक करा