मंदिरावर छत बांधलं की काहीतरी अनिष्ट घडतं? कौल देणाऱ्या मारोती मंदिराचं रहस्य

Sandip Kapde

इतिहास

जळगावच्या बोदवड तालुक्यातील शिरसाळे येथील मारोती मंदिर हे सुमारे ३०० वर्षे जुने आणि जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे.

Shirsale Maruti Temple Mystery

|

esakal

वैशिष्ट्य

या मंदिरातील मारोतीची मूर्ती उघड्या आकाशाखाली आहे. मंदिरावर छत बांधण्याचे अनेक प्रयत्न झाले, मात्र ते यशस्वी झाले नाहीत, अशी श्रद्धा आहे.

Shirsale Maruti Temple Mystery

|

esakal

श्रद्धा

भाविकांच्या मते, हा मारोती भक्तांच्या मनातील प्रश्नांना कौल देतो. त्यामुळे या देवस्थानाला "कौल देणारा मारोती" अशी विशेष ओळख मिळाली आहे.

Shirsale Maruti Temple Mystery

|

esakal

कौल

येथे भक्ताच्या इच्छेनुसार मारोतीच्या मूर्तीवर दोन शिला ठेवण्यात येतात. इच्छा पूर्ण होण्याचा संकेत म्हणून एका बाजूची शिला खाली पडते, अशी श्रद्धा भाविकांमध्ये आहे.e

Shirsale Maruti Temple Mystery

|

esakal

महिमा

अनेक भक्तांनी आपल्या मनोकामना पूर्ण झाल्याचे अनुभव सांगितले आहेत. त्यामुळे या देवस्थानावरील श्रद्धा दिवसेंदिवस अधिक दृढ होत आहे.

Shirsale Maruti Temple Mystery

|

esakal

दर्शन

सलग पाच शनिवार मारोतीचे दर्शन घेतल्यास संकटे दूर होतात आणि जीवनात सकारात्मक बदल घडतात, असा भाविकांचा विश्वास आहे.

Shirsale Maruti Temple Mystery

|

esakal

आख्यायिका

लोककथेनुसार, एका ग्रामस्थाला स्वप्नात दृष्टांत झाला आणि त्यानंतर नदीतून मारोतीची मूर्ती बाहेर काढण्यात आली.

Shirsale Maruti Temple Mystery

|

esakal

eस्थापना

अनेक बैल लावूनही मूर्ती हलत नव्हती, मात्र एका मामा-भाच्याने ती सहज उचलून आणल्याची कथा सांगितली जाते. त्यानंतर कडुलिंबाच्या झाडाखाली मूर्तीची स्थापना करण्यात आली.

Shirsale Maruti Temple Mystery

|

esakal

भक्ती

मंगळवार आणि शनिवार या दिवशी मंदिरात मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी येतात. या दिवशी विशेष पूजाअर्चा केली जाते.

Shirsale Maruti Temple Mystery

|

esakal

उत्सव

हनुमान जयंतीच्या काळात मंदिर परिसरात भक्तांची मोठी गर्दी होते. विविध धार्मिक कार्यक्रम आणि महाप्रसादाचे आयोजन केले जाते.

Shirsale Maruti Temple Mystery

|

esakal

परंपरा

पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या धार्मिक परंपरांमुळे या देवस्थानाचे महत्त्व कायम टिकून आहे. परिसरातील गावांसाठी हे श्रद्धेचे प्रमुख केंद्र मानले जाते.

Shirsale Maruti Temple Mystery

|

esakal

परिसर

मंदिर परिसर शांत, निसर्गरम्य आणि भक्तिमय वातावरणाने नटलेला आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांना मानसिक समाधान मिळते.

Shirsale Maruti Temple Mystery

|

esakal

प्रसिद्धी

कौल देणारा मारोती म्हणून या मंदिराची ख्याती जळगाव जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागांपर्यंत पोहोचली आहे.

Shirsale Maruti Temple Mystery

|

esakal

स्थान

हे देवस्थान जळगावपासून सुमारे ७५ किलोमीटर अंतरावर असून मुक्ताईनगरपासून अवघ्या १२ किलोमीटर अंतरावर आहे.

Shirsale Maruti Temple Mystery

|

esakal

आकर्षण

श्रद्धा, आख्यायिका, कौलाची परंपरा आणि उघड्या आकाशाखाली असलेली स्वयंभू मूर्ती यामुळे शिरसाळे मारोती मंदिर भाविकांसाठी विशेष आकर्षणाचे केंद्र बनले आहे.

Shirsale Maruti Temple Mystery

|

esakal

छत्रपती शिवाजी महाराजांचा सईबाईंसोबत विवाह कुठं झाला होता?

Where Did Shivaji Maharaj Marry Saibai?

|

esakal

येथे क्लिक करा