Maryam Mohammed : कोण आहे मरियम मोहम्मद?, जिच्या सौंदर्याची सध्या जगभरात होत आहे चर्चा!

Mayur Ratnaparkhe

यूएई मधील पहिली महिला -

पहिल्यांदाच संयुक्त अरब अमिराती (यूएई) मधील एक अमिराती महिला मिस युनिव्हर्स स्पर्धेत भाग घेणार आहे.

सौंदर्याची जगभर चर्चा -

या सौंदर्याच्या महाराणीचे नाव मरियम मोहम्मद आहे. तिच्या सौंदर्याची चर्चा सध्या जगभरात सुरू आहे.

 मिस युनिव्हर्स यूएई -

२६ वर्षीय मरियम मोहम्मद हिला मिस युनिव्हर्स यूएई २०२५ चा किताब देण्यात आलेला आहे.

स्पर्धेत भाग घेणारी पहिली महिला -

मरियम ही या किताबासह मिस युनिव्हर्स स्पर्धेत भाग घेणारी पहिली अमिराती महिला ठरली आहे.

पक्षी प्रेमही चर्चेत -

मरियमला ​​पक्षांची देखील आवड आहे. तिचे विविध या पक्षांसोबत फोटो देखील आहेत.

उंटस्वारीची विशेष आवड -

याशिवाय मरियमला उंटावर स्वारी करणे देखील आवडते. मॉडेलिंगसाठी फोटो शूट करताना तिचे उंटासोबतही फोटो आहेत.

शेकडो स्पर्धकांमधून निवड -

मरियम मोहम्मदची निवड कठोर निवड प्रक्रियेनंतर शेकडो स्पर्धकांमधून करण्यात आली.

सिडनी विद्यापिठातून पदवी -

मरियमने सिडनी विद्यापिठातून अर्थशास्त्रात पदवी घेतली आहे.

फॅशन डिझाइनचा अभ्यास -

सध्या ईएसएमओडी दुबई येथे फॅशन डिझाइनचा अभ्यास करणारी मरियम शिक्षण, कला आणि वकिली क्षेत्रात सक्रिय आहे.

दुबईने दिला आत्मविश्वास -

 मरियम म्हणाली की युएईने तिला मोठी स्वप्ने पाहण्याचा आत्मविश्वास दिला आहे. तिला महिलांचा आवाज व्हायचे आहे.

Next : अंघोळ करण्याची योग्य पद्धत काय, शास्त्र काय सांगतं?

Right Way to Bath

|

sakal

येथे पाहा