Sandeep Shirguppe
लवंगाबरोबर लवंग तेलाचे आरोग्यदायी फायदे आहेत. यातील अनेक घटकांमुळे शरिराला उपयोग होतो.
लवंग तेलामध्ये युजेनॉल नावाचे तत्व असते, जे वेदनाशामक आणि जंतुनाशक म्हणून कार्य करते.
लवंग तेल पचनक्रिया सुधारण्यास मदत करते आणि अपचन, ऍसिडिटी सारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म लवंग तेलात असते.
खाज, पुरळ आणि जळजळ कमी करण्यासाठी लवंग तेल शरिराला चोळावे.
लवंग तेल सर्दी, खोकला आणि घसादुखी सारख्या श्वसनमार्गाच्या समस्यांवर आराम देतो.
लवंग तेलाचा उपयोग डास आणि इतर कीटकांना दूर ठेवण्यासाठी म्हणून केला जातो.
लवंग तेलाचा वास आणि शरिराला मसाज केल्यास मानसिक तणावापासून मुक्ती मिळते.