सकाळ वृत्तसेवा
युद्ध केवळ रणभूमीतच लढलं जात नाही. गुप्त माहिती मिळवणं, हेरगिरी करणं हीसुद्धा एक आघाडी असते.
जगभर ‘Mata Hari’ म्हणून ओळखली जाणारी महिला हेर. सौंदर्य, नृत्य आणि डावपेच यांची अप्रतिम सांगड होती
तिचं खरं नाव मार्गरेटा गीर्टरुइडा ज़ेले असून तिचा जन्म 1876 साली नेदरलँड्स येथे झाला. डच लष्करी अधिकाऱ्याशी विवाह केला पण हे नातं लवकरच तुटलं.
लग्नानंतर नृत्यकलेत झेप घेतली. न्यूड डान्सिंग लोकप्रिय करण्याचं श्रेयही त्यांना जाते. त्या युरोपमधील प्रसिद्ध नर्तकींपैकी एक होत्या
फ्रेंच गुप्तचर संस्थेची नजर तिच्यावर होती. तिला जर्मन अधिकाऱ्यांकडून माहिती मिळवण्याचं काम देण्यात आलं.
मात्र ती जर्मनीसाठीही हेरगिरी करत होती. नृत्याच्या आडून दोन्ही बाजूंकडून संवेदनशील माहिती गोळा करत होती.
फ्रान्सने तिला डबल एजंट ठरवलं. तिच्यावर 50,000 फ्रेंच सैनिकांच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा आरोप झाला.
1917 मध्ये वयाच्या 41व्या वर्षी गोळ्या झाडून फाशी देण्यात आली. तिचा मृतदेहही कोणी घेतला नाही,तो वैद्यकीय प्रयोगासाठी पाठवण्यात आला.