सकाळ वृत्तसेवा
फेंगशुई शास्त्रानुसार कासव हे दीर्घायुष्य, शांती आणि स्थिरतेचे प्रतीक आहे. त्याची अंगठी घालणं हे सकारात्मक ऊर्जेला आमंत्रण देतं.
ही अंगठी चांदीची असावी आणि उजव्या हाताच्या मधल्या बोटातच घालावी. चुकीने डाव्या हातात किंवा अन्य बोटात घालू नये.
अंगठी घालताना कासवाचं चेहरा (डोकं) बाहेरील बाजूस असणं आवश्यक आहे. यामुळे समोरून येणारी नकारात्मक ऊर्जा परावर्तित होते.
ही अंगठी घरातील नकारात्मकता, कलह आणि अशांती कमी करते व घरात सौहार्द निर्माण करते.
फेंगशुईनुसार, कासवाची अंगठी धन-संपत्ती आकर्षित करते. ही अंगठी घालणाऱ्याच्या आयुष्यात पैशाचा ओघ सुरू होतो.
ज्यांच्यावर आर्थिक संकट आहे त्यांनी ही अंगठी वापरल्यास हळूहळू अडचणी दूर होतात आणि पैसा साठायला लागतो.
या अंगठीमुळे मन:शांती प्राप्त होते आणि जीवनात मानसिक स्थैर्य निर्माण होतं. कामात एकाग्रता वाढते.
लोकश्रद्धेनुसार, ही अंगठी इतकी प्रभावी असते की सशासारख्या वेगाने पैसा घरात येतो, त्यामुळे अनेकजण याला "लय भारी अंगठी" म्हणून ओळखतात