Aarti Badade
हिवाळ्यात मटार स्वस्त आणि मुबलक मिळतात. रोजची तीच भाजी खाण्याऐवजी या सिजनमध्ये मटारपासून काहीतरी 'हटके' बनवून पहा.
Matar Recipes
Sakal
काहीतरी चटकदार खायची इच्छा असेल, तर उकडलेल्या मटारमध्ये कांदा, टोमॅटो, चाट मसाला आणि शेव मिसळून झटपट हेल्दी चाट तयार करा.
Matar Recipes
Sakal
मटारचा गोळा, आलं-मिरची पेस्ट आणि थोडे बेसन वापरून चविष्ट सारण तयार करा. हे सारण पिठात भरून लाटलेले पराठे लोणी किंवा दह्यासोबत नाश्त्याला भन्नाट लागतात.
Matar Recipes
Sakal
उकडलेले मटार, बटाटे, हिरवी मिरची आणि पुदिना एकत्र करून छोटे कबाब बनवा. ते शॅलो फ्राय केल्यावर बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ लागतात – पार्टीसाठी उत्तम स्टार्टर!
Matar Recipes
Sakal
उकडलेले मटार, लसूण, लिंबाचा रस आणि ऑलिव्ह ऑइल एकत्र वाटून घ्या. हा पौष्टिक हिरवा ह्युमस तुम्ही ब्रेड किंवा क्रॅकर्ससोबत डीप म्हणून खाऊ शकता.
Matar Recipes
Sakal
कमी मसाल्यात मटार आणि नारळाचे दूध वापरून ही भाजी बनवा. मोहरी-जिऱ्याची फोडणी दिलेली ही डिश पचायला हलकी आणि चवीला सुगंधी असते.
Matar Recipes
Sakal
मटार स्वस्त असताना ते सोलून झिपलॉक बॅगमध्ये फ्रिजरमध्ये ठेवा. यामुळे तुम्ही वर्षभर ताज्या मटारचा आस्वाद घेऊ शकता.
Matar Recipes
Sakal
मटार बटाटा सोडून या हिवाळ्यात या नवीन डिशेस नक्की बनवून पहा आणि घरच्यांना सरप्राईज द्या!
Matar Recipes
Sakal
Tilgul Poli recipe
Sakal