मकर संक्रांती स्पेशल! आजीच्या हातची चव देणारी अस्सल तिळगुळ पोळी रेसिपी

Aarti Badade

संक्रांतीचा गोडवा!

मकर संक्रांतीच्या सणाला तिळगुळ पोळीला विशेष महत्त्व आहे. गव्हाच्या पिठात तीळ आणि गुळाचे पौष्टिक सारण भरून बनवलेली ही पोळी चवीला अतिशय अप्रतिम लागते.

Tilgul Poli recipe

|

Sakal

तीळ आणि शेंगदाणे भाजणे

सर्वात आधी तीळ स्वच्छ करून मंद आचेवर खमंग भाजून घ्या. तसेच शेंगदाणे भाजून त्यांची साले काढून घ्या, यामुळे पोळीला छान चव येते.

Tilgul Poli recipe

|

Sakal

चविष्ट सारण तयार करा

भाजलेले तीळ आणि शेंगदाणे थंड झाल्यावर त्यात किसलेला गूळ, वेलची पूड आणि चिमूटभर मीठ घाला. हे मिश्रण मिक्सरमध्ये जाडसर वाटून त्याचे छोटे गोळे तयार करा.

Tilgul Poli recipe

|

Sakal

मऊ कणिक मळण्याची ट्रिक

गव्हाच्या पिठात थोडे मीठ आणि १ चमचा तेल किंवा तूप घालून मऊसर कणिक मळून घ्या. पीठ किमान १०-१५ मिनिटे झाकून ठेवा, ज्यामुळे पोळी फाटणार नाही.

Tilgul Poli recipe

|

Sakal

सारण भरण्याची पद्धत

कणकेचा एक छोटा गोळा घेऊन त्याची वाटीसारखी पारी करा. त्यात तयार केलेल्या तिळगुळाच्या सारणाचा गोळा ठेवा आणि कडा व्यवस्थित बंद करा.

Tilgul Poli recipe

|

Sakal

पोळी लाटताना घ्यायची काळजी

पोळी लाटताना हलक्या हाताने लाटा जेणेकरून सारण बाहेर येणार नाही. ही पोळी खूप जास्त पातळ किंवा खूप जाड नसावी, मध्यम आकाराची ठेवा.

Tilgul Poli recipe

|

Sakal

खमंग भाजून घ्या!

गरम तव्यावर थोडे तूप किंवा तेल सोडा. दोन्ही बाजूंनी सोनेरी तपकिरी डाग पडेपर्यंत पोळी खमंग भाजून घ्या. तुपाचा वापर केल्यास चव अधिक खुलते.

Tilgul Poli recipe

|

Sakal

प्रवासासाठीही उत्तम पर्याय!

या पोळ्या गार झाल्यावरही मऊ राहतात, त्यामुळे प्रवासात सोबत नेण्यासाठी हा एक उत्तम आणि पौष्टिक पर्याय आहे. गरमागरम तुपासोबत याचा आस्वाद घ्या!

Tilgul Poli recipe

|

Sakal

स्ट्रीट फूड लव्हर्ससाठी खास! ट्राय करा झणझणीत ‘कॉर्न चीज फ्राइड मोमोज’

Corn Cheese Momos

|

Sakal

येथे क्लिक करा