कोकणातील 'माटवी' परंपरा काय अन् गणपतीच्या वर रानभाज्या का बांधतात?

सकाळ डिजिटल टीम

कोकण संस्कृती - 'माटवी'

गणपतीच्या आसनाच्या वर लाकडाच्या चौकटीला नैसर्गिक फळे, भाजीपाला, पाने अन् फुले बांधून तयार केलेल्या सजावटीला 'माटवी' (किंवा माटोळी) म्हणतात.

Matvi Secrets: Why Wild Flora Hangs Above Ganesha

|

sakal 

माटवी संकल्पना

ही पृथ्वी म्हणजे साक्षात देवी पार्वतीचे रूप आहे अन् ती आपल्या पुत्राच्या (श्री गणेशाच्या) आगमनासाठी विविध वनस्पतींनी नटली आहे, अशी यामागे श्रद्धा आहे.

Matvi Secrets: Why Wild Flora Hangs Above Ganesha

|

sakal 

पूर्वजांची दूरदृष्टी

भाद्रपदात मिळणाऱ्या औषधी वनस्पती लोकांनी घराभोवती लावाव्यात अन् टिकवाव्यात, याच उद्देशाने आपल्या दूरदृष्टी पूर्वजांनी माटवीची प्रथा सुरू केली.

Matvi Secrets: Why Wild Flora Hangs Above Ganesha

|

sakal 

आयताकृती लाकडी चौकटीची रचना

माटवी बनवण्यासाठी लाकडाची आयताकृती किंवा चौकोनी चौकट वापरली जाते, ज्यामध्ये उभ्या-आडव्या पट्ट्यांची भक्कम रचना केलेली असते.

Matvi Secrets: Why Wild Flora Hangs Above Ganesha

|

sakal 

आंब्याचे टाळ अन् केवणीचे दोर

माटवीमध्ये आंब्याच्या रायवळ डहाळ्या बांधल्या जातात; तर चौकट आणि वनस्पती घट्ट बांधण्यासाठी केवणीच्या सालांचे मजबूत दोर वापरले जातात.

Matvi Secrets: Why Wild Flora Hangs Above Ganesha

|

sakal 

उतरलेला नारळ अन् तवसा (काकडी)

माटवीत पाडलेला नाही तर झाडावरून व्यवस्थित उतरवलेला नारळ, सुपारीचे घोस (शिप्टा) आणि पावसाळ्यात मिळणारी ताजी मोठी काकडी (तवसा) आवर्जून टांगली जाते.

Matvi Secrets: Why Wild Flora Hangs Above Ganesha

|

sakal 

रानभाज्या अन् जंगली औषधी वनस्पती

माटवी रंगीबेरंगी अन् आकर्षक दिसण्यासाठी हरण, कवंडळ, कांगणे, सरवड, आयना, तेरडा, वाघनखी अन् नागकुड्याची दुर्मिळ फळे वापरली जातात.

Matvi Secrets: Why Wild Flora Hangs Above Ganesha

|

sakal 

'इको-फ्रेंडली' सजावट

प्लास्टिक किंवा थर्माकोलचा कोणताही वापर न करता पूर्णपणे नैसर्गिक घटकांपासून बनवलेली माटवी ही खऱ्या अर्थाने १००% इको-फ्रेंडली परंपरा आहे.

Matvi Secrets: Why Wild Flora Hangs Above Ganesha

|

sakal 

विसर्जनाच्या दिवशी प्रसाद

गणेश विसर्जनाच्या दिवशी माटवीतील नारळ आणि तवसा (काकडी) खाली काढून सर्वांना प्रसाद म्हणून वाटण्याची कोकणात विशेष प्रथा आहे.

Matvi Secrets: Why Wild Flora Hangs Above Ganesha

|

sakal 

कोकण-गोवा

प्रामुख्याने कोकण आणि गोव्यात गणेशोत्सवाच्या काळात माटवी बांधल्याशिवाय बाप्पाची सजावट अन् उत्सव पूर्ण मानला जात नाही!

Matvi Secrets: Why Wild Flora Hangs Above Ganesha

|

sakal 

पूजेत झेंडूचे फूल का वापरले जाते?

Why Are Marigold Flowers Used in Puja?

|

sakal 

आणखी वाचा