बाळकृष्ण मधाळे
मावळातील किल्ले विसापूरच्या उभ्या कातळात आणि अवघड ठिकाणी कोरलेले एक अपरिचित असे प्राचीन भुयार प्रकाशात आले आहे.
Mysterious Tunnel Near Visapur Fort
esakal
हे भुयार कोरीव असून नेमकं कशासाठी खोदलं गेलं असेल? कोणी खोदलं असेल? असे निर्माण करणारे प्रश्न निर्माण झाले आहेत.
Mysterious Tunnel Near Visapur Fort
esakal
विसापूर गडाच्या पायथ्यालगत मालेवाडी येथून ‘सफर ३६१ किल्ल्यांची सामाजिक प्रतिष्ठान’चे सदस्य सोमनाथ म्हसे, अनंता गोरे, सागर परब, ओंकार केदारी हे विसापूर गडावर जाताना त्यांना हे प्राचीन भुयार आढळले.
Mysterious Tunnel Near Visapur Fort
esakal
हे भुयार लांब, त्यानंतर खोल व वाकड्या-तिकड्या वळणाचे आहे. ते पाण्याच्या शोधासाठी किंवा ध्यानधारणेसाठी तयार केले गेले असेल का?
Mysterious Tunnel Near Visapur Fort
esakal
की इजिप्तमधील पिरॅमिडमध्ये असणाऱ्या भुयारांमध्ये जसे मृतदेह ठेवत होते, त्याप्रमाणे हे भुयार बनवले असेल? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
Mysterious Tunnel Near Visapur Fort
esakal
या भुयाराचे खोदकाम करताना वापरलेल्या छन्नी हातोड्याचे व्रण स्पष्ट दिसतात. भुयाराची रुंदी आणि उंची तीन बाय तीन फूट असून ते ५० फूट लांब चौकोनी आकाराचे कोरीव आहे.
Mysterious Tunnel Near Visapur Fort
esakal
खालच्या बाजूला पाच फूट खोल असून उजव्या बाजूने पुन्हा सहा फूट लांब आहे. आणि पुढे ते डाव्या बाजूला १२ फूट लांब आहे. शेवट दोन्हीही बाजूला दहा फूट लांब आहे. भुयारात पाणी आणि चिखलदेखील आहे.
Mysterious Tunnel Near Visapur Fort
esakal
अशी अनेक भुयारे लोहगड, विसापूर आणि तुंग गडांच्या कातळकड्याला पूर्वमध्ययुगात खोदलेली आहेत. विसापूर दुर्गाच्या कातळातील हे भुयार निश्चितच निष्कर्ष काढणारे ठरेल हा विश्वास वाटतो.
-डॉ. प्रमोद बोराडे, इतिहास संशोधक
Mysterious Tunnel Near Visapur Fort
esakal
Bhudargad Fort History
esakal